Viral Video : अनेकजण क्रिकेटप्रेमी असतात. मॅच सुरू झाली की, एकटक टीव्हीकडे बघत राहतात. तर काहीजण समुद्राच्या वाळूत, टेरेस, चाळ, रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसून येतात. तर आज सोशल मीडियावर एका क्रिकेटप्रेमीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात व्यक्ती कार्यक्रमात क्रिकेट खेळासारखा डान्स करताना दिसत आहे; ज्यात व्यक्ती फलंदाजी आणि गोलंदाजी करत डान्स स्टेप्स करताना दिसून आला आहे.
व्हिडीओ एखाद्या कार्यक्रमाचा आहे. कार्यक्रमासाठी अनेक मंडळींनी उपस्थिती दर्शवली आहे. कार्यक्रमात जमलेल्या मंडळींसमोर एक व्यक्ती मधोमध उभा राहून डान्स करताना दिसून येत आहे. गाण्याच्या तालावर तरुण क्रिकेट खेळ खेळतात अगदी तसाच डान्स स्टेप्स करताना दिसला आहे. सुरुवातीला व्यक्ती गाण्याच्या तालावर चेंडू फेकते मग फलंदाजी करते. त्यानंतर स्वतःचं चेंडू हवेत फेकून पुन्हा हातात झेलते आणि आउट झाले आहे हेसुद्धा हातवारे करून नाचत सांगते. क्रिकेट खेळात घडणाऱ्या गोष्टी नृत्याद्वारे व्यक्तीने अगदी मजेशीररित्या सादर करून दाखवल्या आहेत. क्रिकेट स्टाईलमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच.




व्हिडीओ नक्की बघा :
क्रिकेट स्टाईलमध्ये केला डान्स :
व्हिडीओच्या सुरुवातीला अनेकांना वाटेल व्यक्ती क्रिकेट खेळतो आहे, पण हा खेळ नसून तरुणाचा अनोखा डान्स आहे; जे पाहून तुम्ही पोट धरून हसाल. बॉलिंग आणि बॅटिंग करत व्यक्ती हा अनोखा डान्स करताना दिसून येत आहे. व्हिडीओ पाहून, बॅट आणि बॉलशिवाय गाण्याच्या तालावर अनोखा क्रिकेट सामना रंगला आहे असे म्हणायला हरकत नाही. क्रिकेट खेळातील विविध गोष्टी व्यक्ती डान्सच्या माध्यमातून करताना दिसून येत आहे. तसेच कार्यक्रमात जमलेले बरेचजण या डान्सचा आनंद लुटताना दिसत आहेत आणि नाचणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन देत आहेत.
क्रिकेट स्टाईलमध्ये डान्स करणाऱ्या तरुणाचा हा व्हिडीओ @doncricket या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘क्रिकेट डान्स’ असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे. हा अनोखा क्रिकेट डान्स पाहून तुम्हालाही काही क्षणासाठी आश्चर्य वाटेल आणि तुम्ही पोट धरून हसाल एवढं नक्की