सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या अंगावर शहारा येतो, तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर अनेकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होऊ शकतं.

हो कारण अनेक जंगली प्राण्यांनी अन्य प्राण्यांची शिकार केल्याचे व्हिडीओ यापूर्वी पाहिले असतील, पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे. जे पाहून अनेकांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये कोब्रा जातीचा साप एका अजगराला गिळताना दिसत आहे. शिवाय तो काही क्षणात अजगराला पूर्णपणे गिळून टाकतानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही पाहा- VIDEO: बाळाला फिरायला घेऊन गेलेल्या आईचं मोबाईलमध्ये लक्ष; चोर डाव साधत मुलाला घेऊन पसार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोब्राने अजगराला गिळल्याचा व्हिडीओ कर्नाटकातील म्हैसूर येथीलअसल्याचं सांगितलं जात आहे. योगायोगाने म्हैसूरमध्ये एकाच दिवशी कोब्राच्या तीन घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये तो एकदा चप्पल गिळतो नंतर कापड गिळतो आणि नंतर एका अजगराला गिळून टाकतो. कॅमेऱ्यात शूट केलेल्या या तीन्ही वेगवेगळ्या घटना आहेत. रविवारी म्हैसूरमध्ये सापाने साप गिळाल्याच्या दुर्मिळ घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.