तुम्ही जर सीरीज प्रेमी असाल, तर तुम्हाला ‘स्क्विड गेम’ माहितेय का? कोरियन सर्व्हायव्हल ड्रामा स्क्विड गेम सध्या नेटफ्लिक्स इंडियावर ट्रेंड करतोय आणि नेटिझन्सला अक्षरशः वेड लावलंय. गूढ खेळ खेळून, लोकांचा ओरडण्याचा आणि त्यांचे प्राण वाचवण्याचा हा खेळ बघण्यात प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. या शोमधली एक विचित्र मोठी बाहुली आठवतेय का? होय, तीच बाहुली जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठवू लागली तर… होय, हे खरंय. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

‘स्क्विड गेम’ सध्या जागतिक स्तरावर हिट झाला आहे. तर नेटफ्लिक्सचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि आणि यशस्वी शो म्हणूनही पाहिला जात आहे. याच शोने प्रेरित होऊन एकाने ‘स्क्विड गेम’ अलार्म बनलाय. जर तुमच्या अलार्मच्या आवाजाने तुमचे डोळे उघडत नसतील, तर हा अलार्म तुमच्या उपयोगाचा ठरणार आहे. कारण हा ‘स्क्विड गेम’ अलार्म तुमची झोप उडवून टाकणरा आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या गाजलेल्या शोमधल्या बाहुलीचा एक स्पेशल अलार्म दिसून येतोय. शोमधील पहिल्या भागात दाखवलेली भितीदायक बाहुलीने तिच्या हातात अलार्म घड्याळ पडकलेलं दिसून येत आहे. अलार्म अ‍ॅक्टिव्ह झाल्यावर ती भितीदायक गाणे गाताना दिसून येतेय आणि गाणं ऐकूनही जर समोरचा व्यक्ती झोपेतून उठलाच नाही तर तर पुढे ती जे काही करते हे पाहून तुमचे डोळे विस्फारून जातील. त्यासाठी हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

पाहा व्हिडीओ:

गॅसपर नावाच्या एका व्यक्तीने ही जगावेगळ्या अलार्मची संकल्पना प्रत्यक्षात आणलीय. याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. त्यानंतर हा जगावेगळा आणि थरकाप उडवणाऱ्या अलार्मचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.

आतापर्यंत शोमध्ये पाहत आलेली ही बाहुली तिच्या स्टाइलने आपल्याला झोपेतून उठवू शकते ही संकल्पना नेटिझन्सना खूपच आवडली आहे. तर काही युजर्सनी लिहिलंय की, असा घाबरवणारा अलार्म जर सकाळी सकाळी वाजला की आपली झोपच उडून जाईल. या अनोख्या अलार्मच्या या व्हिडीओवर आता मीम्स देखील शेअर करण्यास सुरूवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओला आतापर्यंत ६२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा जगावेगळा ‘स्क्विड गेम’ अलार्म पाहून नेटिझन्सनी या व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.