प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील खास क्षण जपून ठेवायला आवडतात. कोणी ते क्षण आठवणींमध्ये जपतात तर कोणी फोटोच्या माध्यमातून. सध्या प्रत्येक महत्त्वाचा क्षण फोटोमध्ये सहज कैद करता येतो. आज काल लोक प्रत्येक गोष्टीचे फोटोशूट करत असतात. वाढदिवस असो, लग्न असो किंवा नव्या बाळाचे आगमन होणार असो…प्रत्येक गोष्टीचे सध्या फोटोशूट होते. त्यामुळेच वेडिंग फोटोशूट, प्री-वेडिंग फोटोशूट, प्रेग्नंसी आणि मॅटर्निटी फोटोशूटचे नवनवीन ट्रेंड सुरु होत आहे. सध्या वेगवेळ्या प्रकारचे फोटोशूट सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. फोटोशूटसाठी वेगवेगळ्या विलक्षण कल्पना देखील शोधल्या जातात. पण सध्या एक प्रेग्नंसीचे फोटोशूट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.
3 पिढ्यांमधील महिला एकाच वेळी झाल्या गर्भवती?
हे फोटोशूट व्हायरल होण्यामागचे कारण देखील तेवढंच विचित्र आहे. फक्त सासू- सुनाच नव्हे तर आई आणि आजी देखील प्रग्नेंट असल्याचे फोटोशूटमध्ये दिसत आहे. फोटोशूट पाहून सर्वांना प्रश्न पडला असेल की नक्की प्रेग्नंट कोण आहे. 3 पिढ्यांमधील महिला एकाच वेळी प्रेग्नंट झाल्या आहेत का? तुम्ही म्हणालं हे कसं काय शक्य आहे. पण हीच तर खरी या फोटोशूटची भन्नाट कल्पना आहे. नक्की काय आहे प्रकरण चला जाणून घेऊ या.
असं आहे सर्व प्रकरण?
सासू-सुनेसह, आई आणि आजीने एकत्र बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीही नाही. खरं तर हा सर्व घाट फक्त मॅटर्निटी फोटोशूटसाठी घालण्यात आला होता. खरं तर प्रेग्नंट फक्त लेक आहे बाकी आई, आजी, सासू सर्वांनी पोटाला उशी लावून फोटोशूट केले आहे. पण या भन्नाट फोटोशूटची कल्पना सुचली कशी ते जाणून घेऊ या.
हेही वाचा: लग्न ठरलंय? सावधान! आधी कोर्ट मॅरेज नंतर घरच्यांच्या इच्छेने ७ फेरे; सासरी पोहोचायच्या आधीच पळाली नवरी, कारण…
अशी सुचली फोटोशूटची कल्पना
जिबिन हा एक फोटोग्राफर आहे. त्याची पत्नी चिंन्जू प्रेग्नंट असल्याचे कळले तेव्हा त्या दोघांसह त्याच्या कुटुंबाला प्रचंड आनंद झाला. जिबिनने त्याच्या पत्नीचे खास मॅटर्निटी फोटोशूट करण्याचे ठरवले. एक दिवस तो फोटो पाहत असताना त्याला ‘या’ मॅटर्निटी फोटोशूटची भन्नाट कल्पना सूचली. पत्नी चिंन्जूला देखील त्याची ही कल्पना आवडली कारण तिच्यासोबत तिची आई, आजी आणि सासू देखील प्रेग्नंसी फोटोशूट करणार होत्या. या फोटोशूटला सोशल मिडियावर खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे.