Indore Girls Fight: इंदूरमधील एलआयजी तिराहे येथे मध्यरात्री दारूच्या नशेत मुलींनी गोंधळ घातला. चार मुलींनी एका मुलीला बेदम मारहाण केली. रस्त्यातच शिवीगाळ करून तिचा मोबाईलही फोडण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दोन महिन्यांपूर्वी इंदूरच्या बीआरटीएस कॉरिडॉरच्या बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त कमी असते. दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एलआयजी तिराहे येथे तीन मुली एका मुलीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तेथे उपस्थित लोकांनी मुलींमधील वादाचा हा व्हिडिओ बनवला.

( हे ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)

चौघींनी मिळून एकीला कशी मारहाण केली ते एकदा पाहाच…

( हे ही वाचा: मगरीने पक्षी समजून ड्रोन कॅमेऱ्यावर केला भयानक हल्ला; पाण्यातून लांबलचक उडी मारतानाचा Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तीन मुली एका मुलीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर पडलेली बेशुद्ध मुलगी त्यांना विरोध करण्याच्या स्थितीत दिसत नव्हती. एका तरुणीने पीडित मुलीचा मोबाईलही फोडला आहे.