Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
Trending News Live Updates, 11 june 2025
"हे दारुडे लोक….." थेट धबधब्याजवळ दारू पित बसले होते लोक, तिथेच टाकला कचरा,; महिलेने Video शेअर करत व्यक्त केला संताप
"एक तरुण माझा पाठलाग करत होता अन्….", पॉण्डिचेरीमध्ये फिरणाऱ्या ट्रॅव्हल व्लॉगरला आला भयानक अनुभव, Video Viral
बापरे! एवढा मोठा साप तुम्ही कधी पाहिलाय का? VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम
वडिलांची ९० रुपयांच्या 'या' शेअरर्समध्ये गुंतवणूक अन् आज मुलगा झाला कोट्यधीश! ३५ वर्षांनी त्यांची किंमत….
Strawberry Moon 2025: 'स्ट्रॉबेरी मून' म्हणजे काय? भारतात आज रात्री दिसणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या…
"वय कितीही असू दे….", नातवाच्या खांद्यावर बसून शिवभक्त आजींचा जयघोष, Viral Video बघून नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक
दागिन्यांसाठी मृत आईच्या चीतेवरच झोपला, स्मशानभूमीत केलं 'असं' काही की…, प्रॉपर्टीसाठी भांडणाऱ्या भावांचा VIDEO व्हायरल
आई मोठी की बाप मोठा? आजोबांनी दिलं लाख मोलाचं उत्तर; VIDEO पाहून लोक म्हणाले "काळजाला भिडणारे शब्द"
VIDEO: भर लग्नात नवरीने नवऱ्याबरोबर 'असं' काही केलं की लग्नच मोडलं, कारण ऐकून बसेल धक्का
बापरे! डोंबिवली रेल्वे स्टेशनवर दिसला साप; प्रवाशांचा उडाला थरकाप, पळापळ अन्…पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO
Snake enters Dombivli Station railway station: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, जो कधीही, कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. साप त्याच्या जबड्यापेक्षा मोठे भक्षदेखील गिळू शकतात, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोंबिवली स्टेशनवर साप सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. साप दिसताच लोक घाबरून वाट्टेल तिकडे पळू लागले. सविस्तर वाचा
VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली
पुढचे सात जन्म हाच मित्र हवा! मित्राच्या लग्नात 'त्याने' दिलं भाषण; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
दमलेल्या बाबासाठी लेकीने केली खास गोष्ट; घरात येताच केलं असं काही की… VIDEO पाहून कराल कौतुक
Video Shows Daughter Welcome Her Father At Home With Surprise : कामावरून घरी दमून आल्यावर घरात सुद्धा शांतता असावी असे अनेकदा वाटते. नाहीतरी कधी-कधी घरात पाऊल टाकताच भावंडांची भांडणे, नवरा-बायकोत वाद, किंवा कामाच्या टेन्शनमुळे अनेकदा चिडचिड सुद्धा होते. त्यामुळे घरात पाऊल टाकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असावे आणि घर आनंदी असावी अशीच इच्छा आपल्यातील प्रत्येकाच्या मनात असते. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये बाबांचे अगदी खास स्टाईलमध्ये लेकीने स्वागत केले आहे. सविस्तर वाचा
बापरे! तरुणाची हिम्मत पाहा; बाईक घेऊन डायरेक्ट ट्रेनच्या डब्यात घुसला; जोर जोरात हॉर्न वाजवला अन्…VIDEO व्हायरल
शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. मात्र, एक तरुण आपली बाईक घेऊन रेल्वेच्या डब्यात घुसला आहे. सीटच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत हा तरुण आपली बाईक चालवत आहे. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सविस्तर वाचा
अपघात, घाम आणि ताण… १० मिनिटांत पार्सल पोहचवण्यासाठी डिलिव्हरी बॉयची अशी असते तारेवरची कसरत; पाहा व्हायरल पोस्ट
“आर्चे तू मला लय आवडती…”आजी-आजोबांनी सादर केली आर्ची परश्याची लव्हस्टोरी; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
अलीकडच्या काळातील अनेक तरुण-तरुणींना प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणं याच गोष्टींकडे लक्ष असतं, त्यामुळे जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी ते नातंदेखील तुटतं. पण, आपल्या आधीच्या पिढीसाठी प्रेम केवळ अपेक्षा पूर्ण करणं नसून एकमेकांच्या सुख-दुःखात एकमेकांना साथ देणं, परिस्थिती समजून घेणं, कधीतरी आपल्या जोडीदाराला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याच्यासाठी ती आवडीने करणं, याला खरं प्रेम म्हणतात. दरम्यान, आता सोशल मीडियाच्या काळात एका रील बनवणाऱ्या आजी-आजोबांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. सविस्तर वाचा