रेल्वे रूळ ओलांडणे हा रेल्वे ॲक्टनुसार गुन्हा आहे. रेल्वेस्थानकावर असलेल्या फूट ओव्हरब्रीजचा वापर करूनच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे सक्तीचे आहे. तरीसुद्धा कारवाईची चिंता न करता असंख्य प्रवासी थेट रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात. वेळ वाचविण्याच्या नादात अनेकांना आपला प्राणही गमवावा लागतो. त्यात रेल्वे सुरक्षा दलाने पकडल्यास दंडात्मक कारवाई किंवा वेळप्रसंगी तुरुंगातही जाण्याची पाळी येते. तरीही लोक एकत नाही, स्वत:बरोबरत इतरांचा जीव धोक्यात घालत हे लोक रेल्वे रुळ ओलांडत असतात. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

एक ट्रेन रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली आहे. प्लॅटफॉर्मवरून एक आरपीएफ जवान चालताना दिसतो आहे. त्याचवेळी एक प्रवासी रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. मोटर मन ने रेल्वे ट्रॅकवरील त्या प्रवाशाला पाहिलं आणि ट्रेनचा हॉर्न वाजवला. तेव्हाच आरपीएफ जवानाचं लक्ष ट्रेन आणि त्या प्रवाशाकडे गेलं. त्याने त्याच क्षणी धाव घेतली आणि तो प्रवाशाला वाचवायला गेला. त्यावेळी ट्रेन अगदी जवळ होती. तरी आरपीएफ जवानाने त्या प्रवाशाला वाचण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: शेतात भाऊ जीवावर उठला, मोठ्या भावानं थेट अंगावर ट्रॅक्टर चढवला, शेवट पाहून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगितलं की लहान मुलं ती करतातच. खरंतर हे लहान मुलंच नव्हे तर प्रौढांच्या बाबतीही सारखंच आहे. जिथं धोका आहे, असं सांगितलं जातं तिथंच काही लोक मुद्दामहून जातात आणि आपला वारंवार आपला जीव धोक्यात घालतात. या व्हिडीओवर नेचकरीही संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.