तामिळनाडूतून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. एका मंदिरातील उत्सवादरम्यान अचानक भलीमोठी क्रेन पडल्याने त्याखाली सापडून ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय या घटनेचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहून अनेकांनी घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यातील अरक्कोनम येथे एका मंदिराच्या उत्सवादरम्यान अचानक क्रेन कोसळल्याने ४ भाविकांचा मृत्यू झाला, तर किमान ७ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- ‘या’ रीलमुळे पोलिसांनी तरुणीला ठोठावला १७ हजारांचा दंड; पोलीस म्हणाले, “Viral Video पाहून…”

मंदिर परिसरातील अपघाताबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘मंदिराभोवती भक्तांना नेण्यासाठी या क्रेनचा वापर केला जात होता. नवस पूर्ण करण्यासाठी जमलेल्या भाविकांकडून फुलांचे हार घेत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.’ तर आणखी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘क्रेन अचानक पडली आणि ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ७ जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला.’

अपघाताचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ –

हेही पाहा- Video: राहुल गांधी तरुणीसह आईस्क्रीम खायला गेले अन्..; ती म्हणते, “पुन्हा कधीच यांना..”

कसा झाला अपघात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस भूपालन (४०), बी जोतिबाबू, के मुथुकुमार आणि चिन्नासामी अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अरक्कोनम येथील, केझाविथीमध्ये मंडियाम्मन मंदिरात ‘मायिलेरुम थिरुविझा’ नावाचा कार्यक्रम साजरा केला जात होता. तो पोंगलनंतर साजरा केला जाणारा वार्षिक विधी आहे. याच कार्यक्रमादरम्यान हा अपघात झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी क्रेन ऑपरेटरला ताब्यात घेतलं आहे.