Viral video: सोशल मिडिया म्हणजे आता प्रत्येकासाठीच एक हक्काच प्लॅटफॉर्म झालं आहे. सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. अकीडच्या काळात सोशल मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. मुंबईच्या लोक ट्रेनमधील तर असे कलाकारांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणारे, तर कधी लोकल मधील भांडणे तर कधी लोकांचे डान्स व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

मुंबईच्या लोकांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनलेल्या या लोकल ट्रेनमध्ये रोज वेगवेळ्या गोष्टींचा अनुभव पाहायला मिळतो. कधी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर कधी पुरुषांचा भजनाचा कार्यक्रम ही लोक ट्रेन पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे. सध्या मुंबई लोकलमध्ये काही तरुणींनी डान्स केलेला व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु, रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन तरुणींनी लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्यासारखं दिलात झापुक झुपूक या गाण्यावर थिरकायला लागाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुणी या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. चालत्या लोकलमध्ये या तरुणी थिरकताना तोल न जाऊ देता परफेक्ट डान्स करताना पाहून सर्वच जण या तरुणींचं कौतुक करत आहेत. ‘दिलात झापुक झुपूक वाजत राहतय गं’ या मराठी गाण्यावर त्या डान्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Vibhuti Sawant (@sawantvibhuti911)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलात झापुक झुपूक गाण्यावर तरुणींनी केलेला हा डान्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिलात झापुक झुपूक वाजत राहतंय ग हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. अगदी सोशल मीडियावरील रील्सपासून सर्वत्र या मराठी गाण्याची हवा पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा.