scorecardresearch

Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्

धक्कादायक बाब म्हणजे विजेच्या खांबावर स्पार्क होतात, त्याप्रमाणे टीसीच्या डोक्यावर स्पार्क होताना दिसतं आहे

Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्
हा व्हिडीओ तुमच्या अंगावार शहारा आणणारा आणि मन सुन्न करणारा आहे. (Photo : Twitter )

सोशल मीडियावर अनेक अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुमच्या अंगावार शहारा आणणारा आणि मन सुन्न करणारा आहे. कारण, रेल्वे प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत उभे असणाऱ्या टीसीच्या डोक्यात विजेचा स्पार्क झाल्याची भयंकर घटना या व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

रेल्वे स्टेशनवर अपघाताच्या घटना घडणं हे काही नवं नाही. स्टेशनवरील दुर्घटनांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. कधी ट्रेनमध्ये चढताना, उतरताना तर कधी रुळ ओलांडताना अपघात झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, सध्या जो अपघात झाला आहे तो पाहून तुमचं मन सुन्न होईल.

हेही पाहा- Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत

व्हायरल होत असलेल्या घटनेचा व्हिडीओ @Ananth_IRAS नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून ही घटना पश्चिम बंगालच्या खडगपूर रेल्वे स्टेशनवरील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या ट्विटर वापरकर्त्याने लिहलं आहे, ‘एका पक्ष्याने आणलेला केबलचा एक लांब तुकडा OHE वायरला चिटकतो आणि दुसरा टोक खाली उभ्या असणाऱ्या TTE च्या डोक्याला चिटकल्यामुळे ही दुर्घटना घडली असून जखमी टीसी सध्या धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.’

या व्हिडीओमध्ये दोन टीसी एकमेकांसोबत प्लॅटफॉर्मवर बोलत उभे असताना अचानक एक विजेची तार तुटते ती थेट एका टीसीच्या डोक्यावर पडते. धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या विजेच्या खांबावर स्पार्क होतात, त्याप्रमाणे या टीसीच्या डोक्यावर स्पार्क होताना दिसतं आहे.

हेही वाचा- पाळीव कुत्र्याच्या दिर्घायुष्यासाठी भलता नवस, सुरक्षेसाठी बकऱ्याचा बळी

विजेचा स्पार्क होताच काही कळायच्या आतमध्ये टीसी प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रूळांवर पडताना व्हिडीओमध्ये दिसतं आहे. सुदैवाने दुसरा टीसी पळ काढतो त्यामुळे त्याला काही हानी झाल्याचं दिसतं नाही. दरम्यान, ही घटना नक्की कशामुळे घडली याचा तपास सुरु असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून जखमी टीसीवर सध्या उपचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. पण त्याच्या तब्येती बाबतची कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 19:58 IST

संबंधित बातम्या