‘इस्रो’मध्ये नोकरीची संधी: दरमहा 56,000 रूपयांपर्यंत पगार!

आपल्या करिअरला द्या नवा बूस्ट

'इस्रो'मध्ये नोकरीची संधी

भारताच्या अंतराळ संस्थेने म्हणजे ‘इस्रो’ने कालच एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडत अंतराळ संशोधनात विश्वविक्रम केला. याआधीचा विक्रम रशियाच्या नावे होता आणि त्यांनीही एका वेळी फक्त ३७ उपग्रह अंतराळात सोडले होते.

तर आपल्या संशोधनाने जगातल्या अनेक देशांना मागे टाकणाऱ्या ‘इस्रो’मध्ये नोकरीच्या अनेक संधी आता उपलब्ध झाल्या आहेत

पद:-

शास्त्रज्ञ/इंजिनिअर

तरूण ग्रॅज्युएट्सना लेव्हल १०च्या हिशोबाने पगार दिला जाईल.

पुढील शाखांमध्ये इंजिनिअरिंग केलेल्यांसाठी व्हेकन्सीज् आहेत

इलेक्ट्राॅनिक्स –  ४२

मेकॅनिकल- ३६

काँप्युटर सायन्स- ९

किमान पात्रता:-

शैक्षणिक

उमेदवाराने मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून ‘बी.ई.’ किंवा ‘बी.टेक.’ केलेले असावे.

वयाची मर्यादा

या पदांसाठी वयाची मर्यादा ३५ वर्षे एवढी आहे. ७ मार्चपर्यंत उमेदावाराचं वय जास्तीत जास्त ३५ असावे. वयोमर्यादेत सरकारी नियमांनुसार सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेने होईल. ही लेखी परीक्षा ७ मेला होणार असून अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड,  चेन्नई, गुवाहाटी, हैद्राबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई, नवी दिल्ली, आणि तिरूअनंतपुरम् या १२ शहरांमध्ये होणार आहे.

 

पगार

निवड झालेल्या उमेदवारांना    महिन्याला ५६,१०० रू याप्रमाणे पगार मिळेल.

अर्ज कसा करायचा?

या अधिकृत वेबसाईटवरून या पदांसाठी अर्ज करता येऊ शकतो   isac.gov.in

 

प्रवेश  फी:

हा अर्ज भरताना १०० रूपये फी आॅनलाईन बँकिंगने भरायची आहे.

महत्त्वाच्या तारखा:

आॅनलाईन अर्ज उपलब्ध होण्याची तारीख- १५ फेब्रुवारी

अर्ज भरण्याची शेवटची तारीख- ७ मार्च

परीक्षेची तारीख- ७ मे

वाचा- गुगलमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या चिमुकलीला पिचईंचे ‘सुंदर’ उत्तर

भारताच्या यापुढच्या अवकाशभरारीच्या सफरीचा भाग व्हायचंय? त्यासोबत आपल्याही करिअरलाही एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवायचंय? तर चला मग. सुवर्णसंधी तुमचं दार ठोठावतेय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vacancies in isro

ताज्या बातम्या