सध्या आपण जंगलाचे प्रमाण कमी करून मनुष्यवस्तीला राहण्यासाठी घरे, ब्रिज, बिल्डिंग, रस्ते बनवीत आहोत. त्यामुळे अनेक जंगली जनावरे आपल्या वस्तीमध्ये घुसतात आणि मग एकच गोंधळ उडतो. तसे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अशात अजून एका व्हिडीओची भर पडली आहे. या वेळेस व्हिडीओमध्ये वाघ, बिबट्या किंवा कोणताही साधारण साप नसून, चक्क किंग कोब्राने हजेरी लावल्याचे पाहायला मिळते.
किंग कोब्रा म्हणजे सापांमधील सर्वांत विषारी आणि जीवघेणा साप आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हा साप चक्क एका लहानशा घरातील छताला लावलेल्या पंख्यावर असल्याचे पाहू शकतो. वरचे छत हे लाकडाचा वापर करून बनवलेले आहे. घराची उंचीही बेताची आहे. त्यामुळे पंखा अगदीच डोक्याच्या जवळपास येत असल्याचा अंदाज आपण लावू शकतो.
हेही वाचा : बापरे! Bentley गाडीमधून राजेशाही थाटात ‘या’ प्रवाशाला फिरवणे पडले महागात; हा व्हायरल व्हिडीओ पाहा
इन्स्टाग्रामवर फिरत असणाऱ्या या व्हिडीओमध्ये पंखा धीम्या गतीने फिरत आहे. मात्र, त्या पंख्याच्या एका पातीवर हा किंग कोब्रा आपल्या अंगाचे वेटोळे करून, फणा काढून त्यासह गोल गोल फिरत असल्याचे दिसते. हा साप खूप मोठा नसला तरी मध्यम आकाराचा आहे. तसेच पंख फिरत असल्याने हा साप कोणत्याही क्षणी खाली पडू शकतो, असेही व्हिडीओ पाहताना वाटते.
व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती या कोब्रा सापाच्या अत्यंत जवळ जाऊन शूट करीत असल्याने अनेकांनी व्हिडीओच्या खाली हे ‘असे करणे किती धोकादायक आहे’, अशी काळजी व्यक्त केली आहे. तर असे वन्यजीव नकळत आपल्या घरात शिरतात आणि आपल्याला ते कळतही नाही. हे किती भीतीदायक आहे, असेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे
नेटकऱ्यांच्या या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया आहेत ते पाहू.
हेही वाचा : खाली खोल दरी अन् दोरीच्या मदतीने गड चढतोय चिमुकला! पाहा, अंगावर काटा आणणारा धाडसी Video
एकाने, “मी बाई हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लगेच आमच्या घरातील पंखा तपासून पाहिला!”, असे सांगितले. दुसऱ्याने, “हा गोल गोल फिरणारा खेळ मस्त आहे. माझ्या मित्रांना घेऊन येतो, त्यांनाही आवडेल”, असे साप विचार करीत आहे” अशा आशयाची मिश्कील प्रतिक्रिया लिहिली आहे. तिसऱ्याने, “न्यू फिअर अनलॉक”, असे लिहिलेले आपण पाहू शकतो.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @chandrasekaran6102 या अकाउंटने हा व्हिडीओ साधारण सहा दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २.२ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.