मुंबईतील एका लोकप्रिय हॉटेलमधील एक कर्मचारी चिकन तळण्याची झार वापरून स्वयंपाकघरातील गटार साफ करताना दिसला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेलच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान हॉटलेद्वारे या व्हिडीओबाबत खुलासा करण्यात आला आहे.
आता व्हायरल झालेल्या व्हिडिओची सुरुवातीला कर्मचारी दिसतो ज्याने गणवेश परिधान केला आहे. त्याच्या पायात बुट आहे. स्वयंपाक करताना चिकन तळण्यासाठी वापरला जाणारा मोठा झारा त्याच्या हातात आहे ज्याच्या मदतीने किचनमधील गटाराची स्वच्छता करताना दिसत आहे. किचनमधील नाल्यातून कचरा काढून तो कचरा पेटीत टाक आहे कोणीतरी व्हिडीओ शुट करत असल्याचे पाहताच तो तेथून निघून जातो. त्यानंतर आणखी एका कर्मचाऱ्याबरोबर हा कर्मचारी रस्त्यावरील कचरा टाकताना दिसत आहे.
X वर व्हिडिओ शेअर करताना पत्रकार सिराज नुरानी यांनी लिहिले की, “मुंबईच्या कुर्ला वेस्ट एलबीएस रोडवरील कल्पना थिएटरजवळ इस्तंबूल दरबार नावाचे हॉटेल आहे, ज्याला स्वादिष्ट भोजन दिले जाते. तळलेले काही खात असाल तर काळजी घ्या. त्यामागचे सत्य जाणून घ्या.”
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच अधिकृत रेस्टॉरंट हँडलने इन्स्टाग्रामवर एक स्पष्टीकरण व्हिडिओ जारी केला. रेस्टॉरंटचे मालक शाहबाज शेख यांनी स्पष्ट केले की, “तळण्यासाठी वापरले जाणारे हे झारे फक्त गटार साफ करण्यासाठी वापरले जातात. त्यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना अशा व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका कारण ते इतरांची बदनामी करण्यासाठी प्रसारित केले जातात.”
हेही वाचा – McDमध्ये कर्मचाऱ्याने फ्रेंच फ्राईज वॉर्मरखाली सुकवले फरशी पुसण्याचे मॉप, किळसवाणा Video Viral
एप्रिलमध्ये, अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) नोएडा सेक्टर १८ मधील मॅकडोनाल्डच्या आउटलेटवर आणि सेक्टर १०४ मधील थिओब्रोमा बेकरीवर छापा टाकला कारण या दुकानांमधून अन्न खाल्ल्यानंतर दोन लोक आजारी पडले. ANI नुसार, FDA अधिकाऱ्यांनी मॅकडोनाल्डच्या आउटलेटवर तपासणीसाठी अन्नाचे नमुने गोळा करण्यासाठी छापा टाकला.
त्याच महिन्यात, पंजाबमधील एका १० वर्षीय मुलीचा वाढदिवसाच्या दिवशी बेकरीमधून ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्याने मृत्यू झाला.