अंकिता देशकर

VIP Bags Ad Hindu Muslim Controversy: ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला स्कायबॅगच्या नावाने एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत असल्याचे दिसले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुस्लिम पुरुष एका हिंदू महिलेला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच कंपनीने स्पष्टीकरण जारी केले आहे.

व्हायरल दावा काय आहे?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला असे आढळून आले की हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात ट्विटर, फेसबुक आणि वाॅट्सअ‍ॅपवर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये मुस्लिम पुरुष एका हिंदू महिलेला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसत आहे, ज्यावर अनेकांनी सडकून टीका केली होती.

एका नेटिझनने कंपनीकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदवली आणि ती त्याच्या ट्विटर प्रोफाइलवर शेअर केली.

तपास:

तक्रार नोंदवणाऱ्या वापरकर्त्याची पोस्ट तपासून आम्ही आमचा तपास सुरू केला. या ट्विटर युजरने व्हीआयपी बॅग्जच्या वक्तव्याचा स्क्रीनशॉटही शेअर केला होता.

VIP इंडस्ट्रीज पोर्टफोलिओमध्ये VIP, Carlton आणि Skybags यांचा समावेश होतो. आम्हाला VIPBagsIndia ट्विटर खात्यावर एक ट्वीट आढळले.

आम्हाला कंपनीने शेअर केलेले अधिकृत निवेदनदेखील आढळले . निवेदनात असेही म्हटले आहे की व्हीआयपी इंडस्ट्रीजने, त्यांच्या नावाचा आणि ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर केल्याबद्दल पोलीस तक्रार दाखल केली आहे. व्हीआयपी बॅग्जच्या सोशल मीडिया अकाउंटवर आम्हाला हा व्हिडीओ सापडला नाही.

यानंतर आम्ही Google वर संबंधित रिपोर्ट्स शोधले. आम्हाला न्यूजभारतीचा एक रिपोर्ट सापडला, जिथे त्यांनी व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेडचे शाखा व्यावसायिक प्रमुख क्रिस्टो चाको यांनी केलेली पोलीस तक्रारदेखील शेअर केली होती.

https://www.newsbharati.com/Encyc/2023/4/24/VIP-Bags-issues-statement-over-viral-ad-promoting-Love-Jihad-denies-any-connection-with-it.html

Click to access Complaint-at-Cyber-police-ktym-(2)_202304241948589614.pdf

आम्ही VIP इंडस्ट्रीज लिमिटेडचे शाखा कमर्शियल हेड क्रिस्टो चाको यांच्याशी फोन कॉलवर संपर्क साधला, त्यांनी आम्हाला कळवले की हे प्रकरण आता लीगल टीम हाताळत आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने व्हीआयपी इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याशीदेखील संपर्क साधला, ज्यांनी आम्हाला माहिती दिली की त्यांनी रविवारी केरळ पोलिसांकडे आणि सोमवारी मुंबई पोलिसांकडे, व्हीआयपी बॅग्जच्या नावाने व्हायरल होत असलेल्या जाहिरातीबद्दल पोलीस तक्रार नोंदवली.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला व्हिडीओवर ‘Puffington Ghost’ हा वॉटरमार्कही दिसला. शोधल्यावर आम्हाला असे आढळले की या वापरकर्त्याचे फेसबुक पेज उपलब्ध नाही. नंतर आम्ही व्हिडीओ InVid टूलमध्ये अपलोड केला आणि या व्हिडीओचे मूळ तपासण्यासाठी इंटरनेटवर शोधले.

आम्हाला आढळले की हा व्हिडीओ सुमी राशिकच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर पोस्ट केला गेला होता, आम्हाला तिच्या प्रोफाइलवर पोस्ट केलेले काही फोटोदेखील आढळले, जे या व्हिडीओच्या शूटदरम्यान शूट केलेले दिसत होते.

सुमीने कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘Soofiyum Sujathayum’. सुमी एक मल्याळम् अभिनेत्री आहे. या व्हिडीओतील पुरुष अभिनेता विष्णू के. विजयन आहे. त्यानेही या शूटचे फोटो शेअर केले आहेत.

फोटो आणि व्हिडीओंवर ‘Kcapturess’ असा वॉटरमार्क होता. आम्हाला फोटोग्राफरचे प्रोफाइल सापडले, ज्याने त्यांचे फोटो शूट केले, परंतु त्याचे खाते प्रायव्हेट होते त्यामुळे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते की नाही हे आम्ही पाहू शकलो नाही.

हा व्हिडीओ सुमी राशिक आणि विष्णू के. विजयन यांनी ईद म्युझिक व्हिडीओ म्हणून शूट केल्याचे दिसते आणि कोणी तरी त्यात VIP बॅग्जचा साउंडट्रॅक जोडला आहे आणि तो VIP चा जाहिरात व्हिडीओ म्हणून रिलीज केला आहे, असे दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: व्हीआयपी बॅगने धर्मांतराचा प्रचार करणारी जाहिरात प्रसिद्ध केली नाही, व्हायरल दावा खोटा आहे. व्हीआयपी बॅग्जने व्हायरल जाहिरातीवर एक निवेदन जारी केले आहे आणि या जाहिरातीशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे.