कधी कोणाचं कोणत्या गोष्टीमुळे नशीब बदलेलं हे सांगता येत नाही. आजच्या सोशल मीडियाच्या जगात तर रातोरात काही जण स्टार झाले. असचं काहीसं सध्या व्हायरल होत असलेल्या एका मजुरासोबत झालं आहे. ६० वर्षीय केरळचा एक मजूर जो फिकट रंगाची लुंगी आणि शर्टमध्ये असायचा त्याला सुपर ग्लॅम मेकओव्हर देत एका फोटोग्राफरने चक्क मॉडेल बनवलं. आता या मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

नक्की काय झालं?

मम्मीक्का म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोजंदारी कामगाराने लोकल फर्मचे सूट घालत आणि आयपॅडसह पोझ देत प्रमोशनल फोटोशूट केले. या रोजंदारी कामगारामध्ये मॉडेलिंगची प्रतिभा शोधून काढणारा फोटोग्राफरचं नाव आहे शारिक वायलील. त्याने याआधी त्याच्या सोशल मीडिया पेजवर मम्मीक्काचा एक फोटो पोस्ट केला होता जो अभिनेता विनायकन सारखा दिसत आल्यामुळे चांगलाचं व्हायरल झाला होता.

(हे ही वाचा: Viral Video: …आणि त्याने काही सेकंदात घर तयार केलं; बांधकामाची ‘ही’ पद्धत पाहून व्हाल थक्क!)

(हे ही वाचा: ‘या’ फोटोत लपलेला साप तुम्ही शोधू शकता का? जुनी पोस्ट Viral)

नंतर, जेव्हा फोटोग्राफरकडे तेव्हा काम आलं तेव्हा तो मम्मिकाशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नव्हता. या व्हायरल झालेल्या फोटोशूट मध्ये मम्मीक्काचा मेकअप मजनसने केला होता तर आशिक फुआद आणि शबीब वायलील हे मेकअप असिस्टंट होते.

(हे ही वाचा: विराट कोहलीचा श्रीवल्ली स्टाईल डान्स बघितला? शानदार कॅच घेतल्यानंतरचा Video Viral)

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर सक्रीय

मम्मीक्काचे आता एक इंस्टाग्राम पेज आहे जिथे तो त्याचे नेहमीच्या कपड्यांमधील तसेच मेकओव्हरचे फोटो शेअर करतो. तो आता त्याच्या मूळ वेण्णाक्कड, कोझिकोडमधील कोडिवल्ली येथे एक अभिनेता आहे. मम्मीक्का या यशाने खूश आहे आणि तो म्हणते की, त्याला नियमित नोकरीसह ऑफर मिळाल्यास तो मॉडेलिंग सुरू ठेवेल.