VIRAL VIDEO : कत्तलखान्यात जाण्याच्या भीतीनं गायीनं धूम ठोकली आणि थेट वॉटरपार्कमध्ये स्लाइड्सवर खेळू लागली…

सध्या एका गायीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, “बिचारी गरीब गाय…” कत्तलखान्यात जाण्याच्या भितीने ही गाय पळून गेली आणि वॉटरपार्कमध्ये स्लाइड्सवर खेळू लागली. सोशल मीडियावर सध्या या गायीची चर्चा सुरूय.

viral-cow-set-for-slaughter-escapes-to-waterpark
(Photo: Youtube/ Diário da Região – São José do Rio Preto)

सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. यातील काही व्हिडीओ असे आहेत की, ते पाहून आपल्याला हसू येते. तर, काहींना पाहून आश्चर्यही वाटतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, “बिचारी गरीब गाय…” कत्तलखान्यात जाण्याच्या भितीने ही गाय पळून गेली आणि वॉटरपार्कमध्ये स्लाइड्सवर खेळू लागली. सोशल मीडियावर सध्या या गायीची चर्चा सुरूय.

ब्राझिलमधून हा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक गाय वॉटरपार्कमधल्या स्लाइड्सवर खेळताना दिसून येतेय. सुरूवातीला ही गाय या स्लाइड्सवर बसून खाली घसरण्याचा प्रयत्न करतेय. त्यानंतर आपले पाय आपटत आपटत ती या स्लाइड्सवरून घरसगुंडी खेळण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ती या स्लाइड्सवरून घसरत खाली येते. खाली आल्यानंतर ती तिथेच बसून राहते. बरं, ही स्टोरी इथेच संपत नाही. तर वॉटरपार्कमध्ये स्लाइड्सवर खेळत असलेल्या या गायीला पाहून वॉटरपार्कच्या मालकाने तिला सुरक्षित बाहेर काढलं आणि तिला स्वतःकडे ठेवून घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, या गायली कत्तलीसाठी कत्तलाखान्यात नेण्यात येत होतं. आपल्याला कत्तलखान्यात नेलं जातंय हे जणू या बिचाऱ्या गायीला जाणवलं होतं. म्हणूनच या गायीने आपल्या बचावासाठी तिथून पळ काढला. तिथून पळता पळता ही गाय रिओ डी जनेरियोच्या पश्चिमेला सुमारे ८०० किमी अंतरावर असलेल्या नोव्हा ग्रॅनडामधील एका वॉटर पार्कमध्ये पोहोचली. वॉटरपार्कमध्ये स्लाइड्सपाहून ही गाय स्लाइड्सवर पोहोचली आणि तिथे खेळू लागली.

आणखी वाचा : एका बेघर मुलाला मिठी मारणाऱ्या चिमुकल्याने लोकांची मनं जिंकली; हा भावुक VIDEO VIRAL

आणखी वाचा : VIRAL : गर्लफ्रेंडला किस करण्याच्या नादात पोलिसाने गमावली नोकरी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

ही गाय जवळपास ३१७ किलो वजनाची आहे. तिच्या वजनामुळे या गायीला स्लाइड्सवरून घसरता येत नव्हतं. हे स्लाइड्स सुमारे २०० किलो वजनाच्या अंदाजाने तयार केले आहेत. यावेळी वॉटरपार्कमध्ये माणसांची जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळेच ही गाय तिला हवं तसं स्लाइड्स एन्जॉय करत होती. स्लाइड्स खेळणाऱ्या या गायीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या गायीचं खेळणं पाहून नेटकऱ्यांनी या गायीला ‘टोबोगा’ असं नाव दिलंय. याचं पोर्तुगीजमध्ये भाषांतर ‘स्लाइड’ असं होतं.

काही सोशल मीडिया युजर्सनी विचारलं की बोवाइन वॉटर पार्कमध्ये ही गाय कशी काय पोहोचली? असा प्रश्न विचारत आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की, “कत्तलखान्यातून सुटल्याचा या गायीला आनंद झाला आहे.” हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. प्रत्येकजण या गायीचा व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ जवळपास १ मिलियन लोकांनी पाहिलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral cow set for slaughter escapes to waterpark and takes a slide to freedom video surfaces prp

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या