रूम्येसा गेलगी जगातील सर्वात उंच महिला असून नुकताच तिने पहिल्यांदा विमानातून प्रवास केला. याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने तिचा हा अनुभव सर्वांबरोबर शेअर केला आहे. हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

रुम्येसा गेलगीने इस्तंबूल, टर्की ते सॅन फ्रान्सीस्को, अमेरिका असा १३ तासांचा प्रवास विमानातून केला. इन्स्टाग्राम या प्रवासाचे फोटो शेअर करत तिने लिहले आहे, ‘या प्रवासात कोणतीही अडचण आली नाही. हा माझा पहिला विमान प्रवास होता, शेवटचा नक्कीच नाही. हा आरामदायी प्रवास ज्यांच्यामुळे शक्य झाला, जे या प्रवासात माझ्यासोबत होते त्या प्रत्येक व्यक्तीची मी आभारी आहे.’ टर्की एअरलाईन्सने रूम्येसाला प्रवासादरम्यान अडचणी येऊ नयेत यासाठी इकोनॉमिक क्लासमधील सहा सीटस काढून टाकल्या आणि तिथे एक विशेष पद्धतीने बनवलेले स्ट्रेचर बसवण्यात आले. या प्रवासाचे इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेले फोटो पाहा.

आणखी वाचा : नारळातून खोबरं काढण्याची भन्नाट कल्पना; IAS Officer सुप्रिया साहू यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच

रुम्येसा गेलगीने शेअर केलेले फोटो :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गिनीज’मधील नोंदी प्रमाणे रुम्येसाची उंची २१५.१६ सेमी (७ फुट, ०.७ इंच) इतकी आहे. रुम्येसा टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिला ‘विवर सिंड्रोम’ आहे, हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. यामध्ये हाडांची अनियंत्रित वाढ होते. ती लहानपणी देखील तिच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप उंच होती. ‘सर्वात लांब बोट’, ‘सर्वात लांब हात’, ‘सर्वात लांब पाठ’ हे गिनीज रेकॉर्ड देखील रुम्येसाच्या नावे आहेत.