Viral Post Shows How 10 Minutes Delivery Affect Delivery Boy : ब्लिंकट ॲप भारतातील सर्वात वेगवान ऑनलाइन ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्मपैकी एक; जे फक १० मिनिटांत ऑनलाइन फळं, भाजीपाला, इलेक्ट्रॉनिक्स आणि अनेक वस्तूंची डिलिव्हरी करतात. १० मिनिटांत एखादी वस्तू घरी आली की, आपल्या सगळ्यांनाच भरपूर आनंद होतो. पण, १० मिनिटांत वस्तू दारापर्यंत पोहचवण्याचे काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयसाठी ही तारेवरची कसरत असणार. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होतो आहे; यामध्ये ब्लिंकिटच्या कंपनीच्या डार्क स्टोअर्समध्ये (गोदाम) पार्ट-टाइम पिकर आणि पॅकर म्हणून काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने अलीकडेच डिलिव्हरी बॉयला तोंड द्यावे लागणारे गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.

आता व्हायरल झालेल्या रेडिट पोस्टमध्ये, सांगण्यात आले आहे की, प्रत्येक ऑर्डर शक्य तितक्या लवकर पोहोचवण्याचा त्यांच्यावर दबाव असतो. गोदामे (ज्याला डार्क स्टोअर्स म्हणतात) जी खूपच लहान असतात आणि रॅक, वस्तूंनी भरलेली असतात. त्यामुळे डिलिव्हरी बॉय न थांबता शक्य तितक्या वेगाने ऑर्डर देण्यासाठी धावपळ करत असतात. यादरम्यान अनेकदा त्यांचे अपघात सुद्धा होतात. अनेकदा धावपळीत धक्का लागून फोन देखील तुटतात. यासगळ्यात त्यांचा पगार परवडणारा नसतो. कामावरची जोखीम, ताण त्यांच्या कमाईशी जुळत नाहीत.

अशा प्रकारच्या गोष्टी जवळजवळ दररोज घडतात कारण सगळीकडे माणसांची वर्दळ असते. कामगार पीपीआय (पर पिकिंग आयटम) नावाचा टाइमर फॉलो करतात. जेव्हा त्यांना ऑर्डर केलेली वस्तू सापडत नाही, तेव्हा व्यवस्थापक त्यांना लॉग आउट करून निघून जाण्यास सांगतात. त्यामुळे कामावर वरिष्ठांकडून येणारा दबाव व्यवस्थापक नंतर कामगारांना (डिलिव्हरी बॉयला) देत असतात; असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोस्ट नक्की बघा…

Worked part-time at Blinkit — 10-minute delivery sounds cool, but the reality for workers is brutal
byu/Automatic_Demand_802 inindia

पुढे ब्लिंकिटमधील फुल-टाइम कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधून युजरने म्हंटले की, कामगारांकडून दररोज दोन ते तीन ट्रक मॅन्युअली उतरवणे अपेक्षित आहे. त्यामुळे फुल-टाइम काम करणारे कर्मचारी अनेकदा जास्त वेळ काम करतात. डिलिव्हरी बॉय सतत उभे असतात आणि त्यांना योग्य ब्रेक मिळत नाही आणि जर काही चूक झाली तर त्यांनाचा दोष दिला जातो. हे सर्व प्रयत्न आणि ताण फक्त १० मिनिटांत कोक आणि मॅगी ग्राहकांच्या घरी घरपोच व्हावी म्हणून… १० मिनिटांत डिलिव्हरी करणे ही सोय वाईट आहे असे नाही. पण, जर डिलिव्हरीला १५ किंवा २० मिनिटे लागली तर काही वाईट होईल का? नाही ना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे असे वाटते की, आपण प्रत्यक्षात काम करणाऱ्या लोकांचा विचार न करता वेगाचा पाठलाग करत आहोत. त्यामुळे कदाचित आता फास्ट -जलद सोयीपेक्षा कामगारांच्या कल्याणाची काळजी घेण्याची वेळ आली आहे. शेअर केलेली प्रत्येक गोष्ट रेडिट युजरच्या वास्तविक अनुभवावर आधारित आहे असे सुद्धा त्याने म्हंटले आहे. या सर्व आरोपांना कंपनीने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. सोशल मीडियावर ही पोस्ट @Automatic_Demand_802 या रेडिट पोस्टवरून शेअर करण्यात आली आहे.