Viral Photo: लहान मुलं ही देवाघरची फूलं असतात. त्यांचं मनही अगदी खरं असतं. पण कधीकधी मुलांच्या डोक्यात काय सुरू आहे, याचा अंदाज लावणं कठीण असतं. असंच एका शाळेतल्या विद्यार्थ्यासोबत झालं आहे. अनेकदा परीक्षांशी संबंधित गोष्टीही सोशल मीडियावर व्हायरल होतात. मुलांच्या उत्तरपत्रिकेत त्यांची गमतीशीर उत्तरंही समोर येतात. नुकतीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे, जी वाचून तुम्ही पोट धरून हसाल. मुलं शाळेत परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहतात तर काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही तर काही उत्तरे लिहून निघून जातात. मात्र, असे काही विद्यार्थी आहेत जे वेगळच काहीतर लिहीतात.

आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन नुकताच संपला आहे. हा सीझन तुफान हीट झाला, लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात बिग बॉस मराठीचाच विषय ऐकायला मिळत होता. दरम्यान या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चा झाली तो सदस्य आणि बिग बॉस मराठीचा विजेता सुरज चव्हाण याची. याच सूरजचे फॅन आज घराघरात पाहायला मिळतात. याच बिग बॉसचा परिणाम लहान मुलांवरही इतका झालाय की शाळेतही मुलं बिग बॉसचीच चर्चा आहे. याचंच उदाहरण आता समोर आलं आहे, एका मुलानं परिक्षेच्या उत्तर पत्रिकेत असं काही उत्तर लिहलं की, पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

बिग बॉसचा लहान मुलांवरही परिणाम

आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या उत्तर पत्रिकेत? तर या उत्तर पत्रिकेत, सुरज का दुसरा नाम क्या है? म्हणजेच सूर्याचं दुसरं नाव काय आहे ? याचं उत्तर एका मुलानं “गुलीगत” असं लिहलं आहे. सुरजचा गुलीगत बुक्कीत टेंगुळ हा डायलॉग फेमस आहे आणि हाच डायलॉग ऐकून या मुलानं परिक्षेतही तेच लिहलंय. यावरुन बिग बॉसचा लहान मुलांवरही किती परिणाम झालाय हे पाहायला मिळत आहे.

पाहा उत्तरपत्रिका

हेही वाचा >> तुमची एक चूक आयुष्य संपवेल; डोंबिवलीत भर रस्त्यात स्कूटीला लागली आग, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाचे हे उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिलं आहे की, हा सगळा पालकांचा दोष आहे त्यांनी असे कार्यक्रम मुलांना बघायला देऊ नये.. तर दुसऱ्याने लिहिले की, मुलगाही खूप हुशार दिसतो. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे