Dod Viral Video: समाजमाध्यमांमुळे अनेक चांगल्या-वाईट गोष्टी सहज लोकांपर्यंत पोहोचतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, आपले मनोरंजन करतात. तर काही व्हिडीओंतील सत्य घटना पाहून आपल्या पायाखालची जमीन सरकते. त्यात अनेकदा अपघात, मारहाण अशा दुर्घटनांचाही समावेश असतो. या घटना कधी माणसांबरोबर होतात, तर कधी प्राण्यांबरोबर होतात. अशा व्हिडीओंवर लोक खूप संताप व्यक्त करताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

श्वान हा अनेकांचा लाडका व आवडता प्राणी आहे. त्यामुळे अनेक जण मोठ्या हौसेने त्याला घरी पाळतात, त्याचे सर्व लाड पुरवतात. त्याला घरातील महत्त्वाच्या सदस्याप्रमाणे वागणूक देतात. पण, समाजामध्ये प्राण्यांचा द्वेष करणारेही लोक आहेत; जे प्राण्यांना विनाकारण त्रास देतात. त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. मुक्या प्राण्याला अमानुषपणे मारून ते पापाचे धनी होतात. आजपर्यंत सोशल मीडियावर तुम्ही श्वानांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या धक्कादायक व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती श्वानाचा जीव घेताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभा राहून एका झाडावर दोरी टाकून, एका श्वानाला गळफास लावताना दिसत आहे. त्या वृद्धाने यावेळी श्वानाच्या गळ्यामध्ये एक दोरी बांधली असून, दुसऱ्या बाजूने ती दोरी तो झाडावर टाकून ओढताना दिसत आहे, ज्यामुळे श्वानही जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. ही धक्कादायक घटना भररस्त्यात होत असून, यावेळी एकही व्यक्ती श्वानाची मदत करण्यासाठी आली नाही. मात्र, सोशल मीडियावर नेटकरी ही घटना पाहून संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘मरण थांबवणं कोणाच्या हातात आहे…’ पर्यटकांच्या गर्दीतून वाघाने श्वानाला गाठलं; घटनेचा थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ @official_vishwa_96k या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, यावर अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिलेय, “म्हाताऱ्यालाही लटकवायला पाहिजे तसंच झाडावर”, तर दुसऱ्याने लिहिलेय, “तो व्हिडीओ काढणारा काय करत होता”, त्याने मदत का केली नाही. तर, आणखी लिहिलेय, “या व्यक्तीला त्याच्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळणार.”