Viral Video: डान्सची आवड असलेल्या काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय. ही महिला या व्हिडीओमध्ये एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला एका लग्नामध्ये स्टेजवर उभी राहून एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्यासह आणखी काही महिला डान्स करत आहेत; परंतु तिच्या डान्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या महिलेचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangeeta_mishra05 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत १८ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिलेय, “काय नाचल्या राव.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “जबरदस्त डान्स.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “काकू तुम्ही कडक नाचता.”