Video Bride Cuts Hair On Wedding Day: सोशल मीडियावर लग्नाचा ट्रेंड नेहमीच चर्चेत असतो. प्रत्येकजण आपला खास दिवस अजून स्पेशल करण्यासाठी एक ना अनेक आयडीयाज काढत असतो. अलीकडे एका नवऱ्याने आपल्या नव्या नवरीला सरप्राईज देण्यासाठी १ मिनिटात १०० लोकांसमोर बायकोचे चित्र काढले होते. एवढंच नव्हे तर लग्नात कधी कुणी हेलिकॉप्टरमधून एंट्री घेतं, कुणी नाचत मंडपात येतं.. थोडक्यात काय प्रत्येकाला लग्नात खऱ्या अर्थाने उत्सवमूर्ती म्हणून मिरवण्याची इच्छा असते. अलीकडेच अशाच एका ख्रिश्चन लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वधूने आपल्याच लग्नात स्वतःचे केस कात्रीने कराकरा कापले आहेत.
लग्न लागताच रिसेप्शन पार्टीदरम्यान वधूने आपले केस कापण्याची घोषणा करून नवऱ्यासह सर्वांना धक्का दिला. त्याहूनही तिचा हेतू इतका पवित्र होता की ते ऐकून सगळ्यांनीच तिला पाठिंबा दिला. प्राप्त माहितीनुसार कर्करोगाच्या रुग्णांना दान करण्यासाठी तिने केस कापले आहेत.
मिशिगन वेडिंग फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आणि ब्रियाना एसलिंगर यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पांढऱ्या शुभ्र वेडिंग गाऊनमध्ये हि नवरी दिसत आहे. जशी ती पार्टीमधून बाहेर पडते तेव्हा भाऊज थरथरत्या आवाजात ती कर्करोगाच्या रुग्णांना दान करण्यासाठी तिचे लांब केस कापणार आहे, सांगितले.
बहुधा हा प्लॅन आधीच तिने मनाशी केला असावा म्हणूनच लगेच तिथे तिचे लांब केस कापण्यासाठी एक हेअर ड्रेसर असतो. तिने छान बॉबकट करून खांद्यांपर्यंत केस कापले. जेव्हा ती आरशात पाहते तेव्हा आनंदाचा व समाजाला काहीतरी देऊ केल्याचा भाव तिच्या चेहऱ्यावर झळकतो. या नववधूच्या आईचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. ती म्हणाली, “कॅन्सरच्या उपचाराच्या दरम्यान केसगळती होताना आईला दुःख व्हायचे हे मी विसरू शकणार नाही म्हणूनच मी आज कॅन्सर रुग्णांसाठी केस दान करत आहे”
नवरीने स्वतःचे केस कापले
हे ही वाचा<< रोनाल्डो गर्लफ्रेंडसाठी सौदी अरेबियाचा मोठा कायदा मोडणार; अधिकारी म्हणतात, “आम्ही त्याला..”
दरम्यान हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, क्लिपला ३४ लाख व्ह्यूज व 1.7 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.