Cutest ring ceremony viral moment : आयुष्यभरासाठी जोडीदार निवडताना खूप विचार करावा लागतो. आपली फसवणूक होऊ नये यापेक्षा जास्त भीती त्याच्याबरोबर आपण आनंदी राहू का. हाच विचार आपल्या मनात सतत येत-जात राहतो. पण, अगदी लग्न ठरल्याच्या दिवसांदरम्यान किंवा अगदी रिलेशनशिप किंवा मैत्री सुरू असणाऱ्या काळात असा एक क्षण येतो जेव्हा त्याच्या कृती किंवा बोलण्यातून ‘हाच जोडीदार आपल्यासाठी योग्य आहे’, असे आपल्याला नकळत जाणवते. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जोडप्याच्या कायमस्वरूपी लक्षात राहील असा एखादा तरी क्षण साखरपुडा किंवा लग्नात घडावा, अशी त्यांची इच्छा असते. पण, हा क्षण फोटोग्राफर किंवा कोणी सांगितला म्हणून नाही, तर अगदी नैसर्गिकपणे, अचानकपणेच घडून यावा. तर आयुषी आणि उत्कर्ष यांच्या साखरपुड्यातसुद्धा असेच काहीसे घडले. दोघांमध्येही अंगठी पहिल्यांदा कोण घालणार याबद्दल काहीच चर्चा झालेली नसते. अंगठी घाला, असं सांगताच दोघेही गुडघ्यांवर एकसाथ खाली बसायला जातात. त्यांच्यातील हा गोड क्षण पाहून दोघेही हसतात.
“हा प्लॅन नव्हता; परफेक्ट टाइम होता” (Viral Video)
सोलमेट म्हणजे तो किंवा ती ज्याच्याशी तुमचे मन, विचार आणि भावना नैसर्गिकपणे जुळतात. जसे तुम्ही या व्हिडीओत पाहिले. काहीही न ठरवता, चर्चा न करता दोघांनीही एकाच क्षणी, एकमेकांबद्दल एकच विचार केला, प्रयत्न दोन्ही बाजूंनी केले आणि अंगठी घालायला दोघेही गुडघ्यांवर एकसाथ खाली बसले.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @utkarshayushi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आमच्यात कोण आधी अंगठी घालणार हे ठरलं नव्हतं म्हणून आमच्यातल्या ‘प्रेमानं’ दोघांनाही एकत्र बसायला भाग पाडलं’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ युजर्स प्रेमात पडले आहेत आणि “दोघे खरोखर एकमेकांसाठीच बनलेत”, “या क्षणाचे आम्ही साक्षीदार झालो”, “हा प्लॅन नव्हता; परफेक्ट टाइम होता”, “तो हा क्षण अगदी गोड आणि सुंदर होता. तुम्ही दोघं खरंच एकमेकांसाठीच बनलेले आहात” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
