Viral Video: लग्न हा प्रत्येक मुलीच्या दिवसातील आनंदाचा दिवस असतो. लग्नानंतर मुलगी दुसऱ्या घरात जाते आणि तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. त्यामुळे मुलीच्या लग्नात आई-बाबा कोणतीही कसर सोडत नाहीत. तिच्या प्रत्येक इच्छेनुसार तिचं लग्न थाटामाटात लावून देतात; तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत कुटुंबातील सदस्यांनी लाडक्या लेकीला मेहेंदीच्या कार्यक्रमात खास सरप्राईज दिले आहे.

माही या तरुणीचे लग्न असते. तर लग्नघरात तिच्या मेहेंदी कार्यक्रमाची तयारी सुरू असते. कुटुंबातील या लाडक्या लेकीने तिच्या मेहेंदी कार्यक्रमासाठी इंडो-वेस्टर्न असा हिरव्या रंगाचा घागरा परिधान केलेला असतो. जेव्हा नवरी घरात प्रवेश करते, तेव्हा गाणं लावण्यात येतं आणि कुटुंबातील सर्व सदस्य मिळून तिचे हृदयस्पर्शी स्वागत करतात. कुटुंबातील सदस्यांनी लाडक्या लेकीचे कसे स्वागत केले, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…गाडी पार्किंगसाठी मॉलसमोर अनोखा बोर्ड; वाहनचालकांना मोजावे लागणार ‘एवढे’ पैसे; PHOTO पाहून नेटकरीही थक्क

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, नवरी तिच्या मेहेंदी कार्यक्रमासाठी घरात प्रवेश करते, तेव्हा कुटुंबातील सदस्य हातात एलईडी दिवे घेऊन गुडघ्यावर बसलेले दिसत आहेत. व्हिडीओ जसा पुढे जातो तसं “कल हो ना हो” या बॉलीवूड चित्रपटातील ‘माही’ हे गाणं लावून, एलईडी दिवे ओवाळून तिचे अनोखे स्वागत करतात. हे पाहून लाडकी लेक भावूक होते. त्यानंतर तिच्या होणाऱ्या नवऱ्याची डान्स करत जबरदस्त एंट्री होते आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात; असा व्हिडीओचा गोड शेवट होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mahiparmar_04 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक होताना दिसत आहेत. एका युजरने ‘मी आतापर्यंत पाहिलेला हा सर्वात बेस्ट व्हिडीओ आहे’, अशी कमेंट केली आहे; तर काही जण त्यांच्या भावना विविध शब्दांत कमेंटमध्ये मांडताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.