viral Video: ग्रामीण पंजाबचे रहिवासी, त्यांच्या श्रद्धा, संपत्ती, व्यवसाय आणि ओळख प्रतिबिंबित करण्यासाठी फुटबॉल, धार्मिक चिन्हे, वाहने इत्यादींच्या आकारात पाण्याच्या टाक्या बनवून त्या सुरक्षितरित्या घराच्या गच्चीवर ठेवतात. अलीकडच्या काळात विमानांच्याही पाण्याच्या टाक्या बनवल्या जात आहेत. कारण अधिकाधिक पंजाबचे रहिवासी स्थलांतरित होत आहेत आणि विमानाचे मॉडेल परदेशातील त्यांच्या यशाचे, त्यांच्या संपत्तीचे आणि समाजातील दर्जाचेही विधान बनले आहे ; असे छायाचित्रकार राजेश व्होरा यांनी सांगितले आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात चक्क फुटबॉल, विमान नाही तर चक्क ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ च्या पुतळ्याची प्रतिकृती इमारतीवर उभारली आहे.

अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ जगभरात प्रसिद्ध आहे. जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेला हा पुतळा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं प्रतिक आहे. अनेक जण खास सहल काढून या प्रसिद्ध ठिकाणाला भेट द्यायला जातात. पण, पंजाबच्या एका रहिवाशाने इमारतीच्या गच्चीवर ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ चा पुतळा उभारला आहे. एका बांधकाम सुरु असणाऱ्या एका इमारतीच्या गच्चीवर जगातील सात आश्चर्यांपैकी एक ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ च्या पुतळ्याची प्रतिकृती तयार केली आहे. कशाप्रकारे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ च्या पुतळ्याची प्रतिकृती बांधण्यात आली आहे एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…क्युट शेफ! आजीबाईंनी कविता सादर करत बनवला ‘असा’ बर्गर की, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल फॅन

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पंजाबमधील काही स्थानिक लोक इमारतीच्या गच्चीवर ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ च्या पुतळ्याची प्रतिकृती ठेवताना दिसत आहेत. घराच्या गच्चीवर क्रेनच्या साह्याने ही प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. व्हिडीओ काही वेळाने झूम झाल्यावर बांधकाम सुरु असणारी संपूर्ण इमारत आणि बांधकामाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या क्रेनची झलक दाखवते आहे. पण, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नक्की हे करण्यामागचे कारण काय असेल? तर एका माणसाचा युएसचा व्हिसा नाकारल्याने त्याने स्वतःच्या घरच्या टेरेसवर ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ च्या पुतळ्याची प्रतिकृती उभारली आहे ; असे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @WeekendInvestng या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आलोक जैन या युजरने हा व्हिडीओ शेअर करीत, “पंजाबमध्ये एका ठिकाणी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ चा पुतळा बसवला आहे’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत.