प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अनोखे कौशल्य असते. नोकरी करता करताच बहुतांशी व्यक्ती कसला ना कसला एक तरी छंद जोपासत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये चित्र काढणे, डान्स करणे, मेंदी काढणे किंवा शिवणकाम, तर कोणाला गाणे, तर कोणाला वाद्ये वाजवण्याचा छंद असतो. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानुसार एका व्यक्तीला विविध वाद्ये वाजवण्याचा छंद आहे; पण ही एक वा दोन वाद्ये नसून, चक्क १११ वाद्ये आहेत.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती विविध वाद्ये वापरून स्वत:चे अनोखे टॅलेंट दाखवताना दिसते आहे. त्या व्यक्तीने चक्क १११ सेकंदांत १११ वाद्ये वाजवून दाखवली आहेत. वेळ लक्षात येण्यासाठी टायमरही लावण्यात आला आहे. तो टायमर लक्षात घेता, सेकंदाला ही व्यक्ती हातातील वाद्ये बदलताना दिसत आहे; जे पाहताना तुमची नजर हटणार नाही. तसेच या १११ वाद्यांचे संगीत (म्युझिक) ऐकताना तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल एवढे नक्की. १११ वाद्ये कोणती आहेत हे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…३३ वर्षांनंतर आढळली फुलपाखराची नवीन प्रजाती; आयएएस अधिकाऱ्यांनी शेअर केला फोटो…

व्हिडीओ नक्की बघा :

१११ सेकंदांत वाजवली १११ वाद्ये :

संबंधित व्हिडीओतील व्यक्ती बासरी वाद्यापासून वाजवायला सुरुवात करते आणि शंख, तबला, इलेक्ट्रिक पियानो, गिटार, बॅन्जो, ॲकॉर्डियन, कॉर्नेट, राइड सिम्बल, इलेक्ट्रिक बास आदी अनेक वाद्ये वाजवताना दिसते. त्यात अशी अनेक वाद्ये आहेत की, जी तुम्ही क्वचितच आपण सर्वांनी पाहिली नसतील. एक संगीतकारदेखील एका वेळी फक्त पाच ते सहा वाद्ये हाताळू शकतो. पण, या व्यक्तीने चक्क १११ वाद्ये वाजवून दाखवीत अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @Rainmaker1973 एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध शब्दांत त्या व्यक्तीचे कौतुक करताना दिसून येत आहेत आणि या अनोख्या टॅलेंटचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.