Man Desi Jugaad Viral Video : २० लिटरच्या कॅनमधलं पाणी ग्लासात ओतताना, तुम्हाला अनेकदा पाण्याचा डिस्पेंसर किंवा पाईप असणाऱ्या दुसऱ्या कंटेनरची गरज भासते. काही जण हे भलंमोठं कंटेनर उचलू शकतात आणि थेट ग्लासात पाणी ओतू शकतात. पण, बारीक लोकांसाठी ही गोष्ट करणे थोडे कठीण होऊ शकते. तर यासाठी की गंमत म्हणून माहिती नाही एका मुलाने जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे.
व्हिडीओमध्ये, एक माणूस २० लिटरच्या कॅनमधून कंटेनर किंवा वॉटर डिस्पेंसरशिवाय पाणी काढण्यासाठी जबरदस्त युक्ती वापरतो. त्याची पद्धत जितकी अनोखी आहे तितकीच मनोरंजक सुद्धा आहे. २० लिटरच्या कॅनमधून पाणी काढण्यासाठी, त्याने १ लिटरची स्प्राईटची बाटली घेतली आहे. तो कॅनच्या पाणी बाहेर येणाऱ्या जागेत अशाप्रकारे बाटली अडकवतो की, त्यातून पाणी ग्लासात ओतणे अगदी झोपे होऊन जाते.
कॅनलमधलं पाणी काढणं आता झालं सोपं (Viral Video)
जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही. कारण भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की, जे पाहून खरंच थकोणीतही थक्क होऊन जाईल. आता हाच जुगाड पाहा ना, एका तरुणानं २० लिटर पाण्याच्या कॅनमधून पाणी पिण्यासाठी जबरदस्त शक्कल लावलेली दिसते आहे. एका हाताने तो २० लिटरचा कॅन उचलण्यापेक्षा त्याने बाटली अडकवून थेट ग्लासात पाणी ओतून घेतले. यामुळे पाण्याचा अपव्यय न होता नळाशिवाय पाणी सहज बाहेर पडते.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mr_umesh0018 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “२० लिटर कॅनलमधलं पाणी काढणं आता झालं सोपं ” ; अशी कमेंट व्हिडीओला दिली आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून ‘ही कल्पना आमच्या डोक्यात का नाही आली’, ‘२० लिटर कॅनमधलं पाणी पिणे आता सोपे झाले आहे’, ‘काहीही बोला जुगाड तर मस्तच आहे’, ‘शर्टवर लिहिल्याप्रमाणे विकसित भारताचा, विकसित मुलगा’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
