Viral Video: आई म्हटली की, तिच्या प्रेमासोबत तिचा रागही ओघाने आलाच. आई तिच्या मुलांवर जेवढे प्रेम करतेच, तेवढीच ती प्रसंगी त्यांच्यावर रागावते, ओरडते आणि वेळ पडल्यास त्यांना चोपही देते. आई आणि तिच्या मुलांमधील हे खास नाते खूप अनमोल आहे. आई आणि मुलांच्या प्रेमाचे असे अनेक गोड किस्से सोशल मीडियामुळे आपल्या सतत पाहायला मिळत असतात. आता असाच एक आई आणि मुलाच्या नात्यातील एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील जंगलातील एका वाघिणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात तिची चार-पाच पिल्ले तिला कुरवाळत होती. वाघीण आणि तिच्या पिल्लांमधील या वात्सल्यमयी नात्याचा व्हिडीओ अनेकांना आवडला. दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माकडीण तिच्या पिल्लाला चोप देताना दिसत आहे.

a guy returned after 2 and half year from london and enter at home as a unknown person
Video : अचानक अनोळखी व्यक्ती घरात शिरली अन् घरच्यांनी ओळखलेच नाही, मायदेशी परतलेल्या मुलाने दिले भन्नाट सरप्राइज
How To Use Umbrella While Wearing Saree
साडी नेसल्यावर छत्री कशी पकडायची? २५ लाख लोकांनी पाहिलेल्या VIDEO मध्ये आहे तरी काय? पाहून पोट धरुन हसाल
Haris Rauf Fight Video Viral
‘हा भारतीय असणार…’ असं म्हणत हारिस रौफ चाहत्यावर गेला धावून, संतापलेल्या हारिसने पत्नीलाही ढकललं; VIDEO व्हायरल
Neighbours rescue a man from burning apartment
याला म्हणतात खरी माणुसकी! जळत्या अपार्टमेंटमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा शेजाऱ्यांनी वाचवला जीव, व्हिडीओ व्हायरल
jitendra awhad
पवई भीमनगरमध्ये पोलिसांची दडपशाही? बेदम मारहाणीचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांकडून पोस्ट; म्हणाले, “हा रुमाल बांधलेला माणूस…”
a young man hides wine bottle in secret locker of vehicle
पठ्ठ्याने गाडीमध्ये ‘या’ सीक्रेट जागी लपवल्या दारूच्या बाटल्या; VIDEO पाहून डोकं धराल
Ceejay House mumbai praful patel
ईडीने जप्त केलेली १८० कोटींची मालमत्ता प्रफुल्ल पटेलांना परत मिळणार; ‘वॉशिंग मशीनची कमाल’, राऊतांचा आरोप
The lion's cub was blown away by the buffalo's horn
यारा तेरी यारी को; सिंहाच्या शावकाला म्हशीने शिंगाने उडवले; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “मित्र असावा तर असा”

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ajit38065 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एका माकडिणीचे पिल्लू इतर माकडांना त्रास देताना दिसत आहे. यावेळी माकडिणीने पटकन त्याला बाजूला केले आणि त्याच्या एका पायावर पाय देऊन, त्याच्या डोक्याला घट्ट पकडले आणि जोरात दोन-तीन कानशिलात लगावल्या.

हेही वाचा: याला म्हणतात देवमाणूस! पुरात अडकलेल्या श्वानांना काढलं शोधून; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावूक

पाहा व्हिडीओ:

माकडिणीने पिल्लाला दिलेला बेदम चोप सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओला मिलियन्समध्ये व्ह्युज आणि चार मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्स मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “माझी आईपण मला असंच मारते.” तर दुसऱ्याने लिहिलेय, “हेदेखील एक प्रकारचे मानवच आहेत.” तर आणखी एकाने लिहिलेय, “मदर ऑफ द इयर आहे ही”