Social Media Viral Video : असं म्हणतात की मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. लहान मुलं कितीही गोंडस असली तरी त्यांना सांभळणे फार अवघड काम आहे. जरा नजर हटेपर्यंत लहान मुलं काही ना काही गोंधळ घालून ठेवतात आणि तुमचे काम वाढते. कित्येकदा मुलं स्वत:सह दुसऱ्यांनाही संकट ओढतात. अशावेळी पालकांचे लक्ष नसेल त मोठा अनर्थ होऊ शकतो. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे ज्यामध्ये एक लहान मुल खेळताना वॉशिंग मशीनमध्ये जाऊन बसतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो.

खेळता खेळता वॉशिंग मशीनमध्ये जाऊन बसला मुलगा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा वॉशिंगमध्ये जाऊन बसतो. वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरही तो हसत असतो. तिथे खेळणारा दुसरा मुलगा वॉशिंग मशीनचे बटन चालू करतो. मशीन गोल गोल फिरू लागते आणि त्यासोबत मशीनमधील लहान मुलगा देखील गोल फिरू लागतो. हा व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.

हेही वाचा – ”पिया तू …” हेलनच्या गाण्यावर आजीबाईंनी केला जबरदस्त डान्स, Video एकदा बघाच! उत्साह पाहून त्यांचे तुम्हीही व्हाल फॅन

व्हिडिओमधील मशीन सेमी अ‍ॅटोमॅटीक मशीन असल्याचे दिसते ज्यामध्ये कपडे धुण्यासाठी आणि वाळविण्यासाठी दोन वेगळ्या जागा दिल्या आहेत. व्हिडिओतील लहान मुलगा कपडे वाळविण्याच्या ठिकाणी जाऊ बसतो. हा व्हिडिओ पाहून लोकांच्या काळजात धस्स होत आहे. त्या मुलाला काही दुखापत झाली की नाही याबाबत सध्या काही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत अद्याप समजले नाही.

हेही वाचा – कपलनंतर आलं आता Throuple Relationship! जगभरात होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहे ही भानगड?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहान मुलांना सांभळताना त्यांच्यावर लक्ष असू द्या

एकंदर लहान मुलांना सांभळताना व्यवस्थित लक्ष ठेवावे लागते. थोडं जरी दुर्लक्ष झाले तरी मोठा अनर्थ होऊ शकतो. या व्हायरल व्हिडिओवरून सर्वांनी हे तात्पर्य लक्षात ठेवले पाहजे की, लहान मुलांना सांभाळताना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा.