American Influencer Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक अमेरिकन टूरिस्ट इन्फ्लूएन्सर लोकांना भारतामध्ये न येण्याचे आवाहन करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये क्रिस्टन फिशर नावाची इन्फ्लूएन्सर तिच्या भारताच्या दौऱ्यातील अनुभव सांगते आणि जर इतर पर्यटक भारतात यायला तयार नसतील तर त्यांनी भारतात येऊ नये असे तिला वाटते.
“भारताला भेट देऊ नका कारण…” (Don’t go to India because…)
इनफ्लूएन्सरने ज्याप्रकारे मानसशास्त्राचा वापर करून असं विधान केलं आहे यावरूनच क्रिस्टन फिशरला इंटरनेटवर प्रशंसा मिळत आहे. ती आणि तिचे कुटुंब भारताचा शोध घेत असतानाच्या एका व्हिडिओमध्ये, समृद्ध संस्कृती, वारसा, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि भारतीय पाहुणचारावर तिने भर देते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओ कॅप्शनमध्ये तिने भारतात येणाऱ्या लोकांची कारणे सांगितली, तिने लिहिलं, “माझं ऐका… भारतात जाऊ नका कारण ते तुमचं आयुष्य कायमचे बदलून टाकेल. तुम्हाला अद्भुत लोक भेटतील, अप्रतिम जेवण मिळेल, काही नेत्रदीपक दृश्ये दिसतील आणि इतक्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचा अनुभव येईल. तुम्हाला कदाचित इथून परत जाण्याची इच्छाही होणार नाही”.
ती पुढे म्हणाली, “भारत नेहमीच माझ्या हृदयात राहील, आणि ते तुमचेही हृदय जिंकू शकतं. हे किती सुंदर आणि जीवन बदलणारे ठिकाण आहे. इथे राहणे मला खूप आवडले! मी चार वर्षांपूर्वी इथे आले होते आणि मग मी कधीही मागे वळून पाहिले नाही.”
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @kristenfischer3 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल १.८ मिलियन व्ह्युज आले आहेत.
अमेरिकेने भारतात प्रवास करणाऱ्या आपल्या नागरिकांना प्रवास सल्लागार जारी केला आहे तेव्हा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अमेरिकेने गुन्हेगारी आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे ‘सावधगिरी बाळगण्याचे’ आवाहन केले आहे आणि दहशतवादामुळे देशाच्या मध्य आणि पूर्वेकडील काही भागात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.
गेल्या आठवड्यात जारी केलेल्या प्रवास सल्लागारात असे म्हटले आहे की “बलात्कार हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक आहे” आणि लैंगिक अत्याचारासह हिंसक गुन्हे पर्यटन स्थळांवर आणि इतर ठिकाणी घडतात.