VIRAL VIDEO OF ANGRY BULL: माणसांचं आणि प्राण्यांचं नातं हे अनेक वर्षांपासून आपण पाहत आलोय. माणसं जेवढी प्राण्यांची काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात. त्यापेक्षाही जास्त प्राणी माणसांना जीव लावतात. मुक्या जनावरांच्या या भावना ते नेहमीच त्यांच्या कृतीतून वेळोवेळी व्यक्त करीत असतात.

परंतु, सगळीच माणसं प्राण्यांना जीव लावतील, असंही नाही, काही फक्त त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्यांना दोन वेळचं खायला देतात आणि त्यांचा छळ करतात. काही माणसं भटक्या जनावरांना उगाचच त्रास देण्यासाठी त्यांची खोड काढत असतात. जनावरांना माणसांची तितकीच जाणही असते, उगाच कोणी आपल्याला त्रास दिला, तर त्यांना त्यांच्याच भाषेत इंगा कसा दाखवायचा हे प्राण्यांना लगेच कळतं.

हेही वाचा… नक्की आई कोण तेच समजेना? माय-लेकीचा तमिळ गाण्यावर जबदरस्त डान्स पाहून नेटकरी गोंधळात; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात माणसं मुद्दाम प्राण्यांची खोड काढतात. मग त्यांनी दिलेला हा त्रास त्यांच्याच अंगाशी येतो आणि त्यांची पळता भुई थोडी होते. असाचा काहीसा प्रकार एका गावात घडलेला दिसतोय.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका बैलाचा राग अनावर झालेला दिसतोय आणि तो गावकऱ्यांच्या मागे सुसाट धावताना दिसतोय. ‘sajid_fareed_khan’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

व्हिडीओ सुरू होताच काही गावकरी जीव मुठीत ठेवून जोरदार पळ काढताना दिसतायत. कारण- त्यांच्यामागे एक संतापलेला बैल त्याची शिंगं पुढे करून कोणालाही मारण्याच्या तयारीने पळत सुटलेला असतो. एका बैलाने एवढ्या गावकऱ्यांना पळता भुई थोडी केलेली असते.

या व्हिडीओत (Viral Video) आपण पाहू शकता की, एका माणसाच्या मागे बैल लागताच तो विजेच्या खांबावर चढतो, जिथे आधीच काही गावकरी भीतीने चढलेले असतात. काही जण बैल जवळ आलेला पाहताच कोणाच्याही घरात घुसू लागतात; तर काहींचा तोल जाऊन त्यांचा पाय गटारात जातो. थोड्या वेळाने बैलाचा राग शांत होतो आणि तो एका जागेवर शांतपणे उभा राहतो.

हेही वाचा… धोतर नेसलं म्हणून वयोवृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; VIDEO VIRAL होताच घडली जन्माची अद्दल, पाहा नेमकं काय झालं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर करीत कमेंट केली आहे.