सोशल मीडियावर या ना त्या कारणाने कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो. बरेचदा असं केलं तर काय होईल? असे कुतुहूल वाटणारे व्हायरल व्हिडिओ आपण आवर्जून पाहतो. अश्याच एका व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. बंदूक बाळगणं हे काही प्रत्येकाचं काम नाही. पोलीस किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती जिच्या जीवाला धोका आहे, असे लोकं बंदूक बाळगतात. त्यामुळे बंदूक कशी चालते याबाबत सामान्यांमध्ये कायम उत्सुकता असते. एका व्यक्तीने बर्फाच्या थरावर गोळ्या झाडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. खरं तर बर्फावर गोळ्या झाडल्यानंतर त्याला भेगा किंवा तुटून जातो. मात्र या व्हिडिओत एक गोळी बर्फाच्या आत न जाता बाहेर राहिली.
व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती एका पाठोपाठ एक करत गोळ्या झाडत आहे. त्यापैकी काही गोळ्या बर्फाच्या आता घुसल्या. त्यामुळे त्या भागात भेगा किंवा मोठं छिद्र पडल्याचं दिसत आहे. त्यानंतर एक गोळी बर्फाच्या आत घुसली नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. तेव्हा तो धावत तिथे जातो आणि गोळीचं निरीक्षण करतो. तेव्हा ती गोळी त्या थरावर भिंगरीसारखी वेगाने फिरताना दिसते. त्या गोळीला दोनदा हात लावल्यानंतर ती गोळी फिरत राहते, इतका वेग असतो.
हा व्हिडिओत @memewalanews या इन्स्टाग्राम अकॉउंटवरून शेअर केला आहे. तसेच व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी शेअर केला आहे. या व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून त्याखाली कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.