सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून लोक अशा प्रकारचे व्हिडीओ करीत असतात.

अनेक जण उच्च शिक्षणासाठी मायदेशातून परदेशांत जातात. कुटूंबापासून दूर परदेशात शिक्षण घेताना मायदेशाची आठवण येणं साहजिक आहे. अशात परदेशात जाऊन आपला पारंपरिक पोशाख घालून परफॉर्मन्स करणं म्हणजे वेगळाच आनंद.

हेही वाचा… रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; वर्गात बेंचवर चढली अन् तरुणीबरोबर असं काही झालं की…, पाहा VIDEO

आजकाल शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या डान्सचे व्हिडीओदेखील तुफान व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, त्यात परदेशातील युनिव्हर्सिटीमधील कार्यक्रमात एक विद्यार्थिनी करीना कपूरच्या गाण्यावर थिरकताना दिसतेय.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओत एक विद्यार्थिनी गुलाबी साडी नेसून, स्टेजवर बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दबंग २ या चित्रपटातील ‘फेविकॉल से’ या लोकप्रिय बॉलीवूड ट्रॅकवर या विद्यार्थिनीनं जबरदस्त परफॉर्मन्स केला. ऑस्ट्रेलियातील चार्ल्स डार्विन विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थिनीनं हा नृत्याविष्कार सादर केला आहे.

हेही वाचा… कॉलर पकडली, बेल्टने मारलं अन्…,फक्त ‘काका’ म्हणाला म्हणून साडीच्या दुकानात झाला राडा, VIDEO पाहून भरेल काळजात धडकी

विद्यार्थिनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान गाजतोय. गुलाबी साडी नेसून झुमके घालून, तिने या डान्सच्या हुक स्टेप्स करीत कार्यक्रम गाजवला. हा व्हिडीओ @hima_aby या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “जेव्हा तुम्हाला ऑस्ट्रेलियन विद्यापीठामध्ये ‘देसी गर्ल’ बनण्याची संधी मिळते” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

हेही वाचा… मारुतीचा मोठा धमाका! फक्त ११,००० मध्ये प्री-बूक करा ‘ही’ नवीकोरी कार, व्हेरियंट्स अन् फिचर्स पाहून व्हाल फिदा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं की, खूप मस्त डान्स केला. तर दुसऱ्यानं, ऑस्ट्रेलियातील भारतीय मुलीचा सुंदर डान्स, अशी कमेंट केली.