Viral Video of influencer: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला थक्कच करणारे असतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात व्हायरल होण्यास जास्त वेळ लागत नाही. प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल लोक काहीही करू लागले आहेत. सध्या सोशल मीडयावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात एका तरुणीने सगळ्यांना तिच्या कानाखाली मारायला सांगितले.

व्हायरल व्हिडीओ

दिल्लीमधल एक इन्फ्ल्यूएन्सर सध्या चर्चेत आहे. या इन्फ्ल्यूएन्सरने भररस्त्यात वाटसरूंना तिला कानाखाली मारण्यास सांगितले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या महिलेने “स्लॅप मी” (मला कानाखाली मारा) असे लिहिलेले फलक हातात धरले. फलक पाहताच अनेक जण तिच्याजवळ आले आणि तिच्या कानाखाली मारू लागले. त्यात महिला, पुरुष आणि एक लहान मुलगीही होती.

हेही वाचा… “काका ऑन फायर”, फटाका पेटवला अन् चक्क डोक्यावरच ठेवला, काकांबरोबर पुढे काय घडलं? पाहा VIDEO

पण, ही मुलगी भररस्त्यात सगळ्यांना कानाखाली का मारायला सांगत आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडत असेल. खरं तर या सीनमध्ये एक ट्विस्टपण आहे; ज्यात पैशांचा समावेश आहे.

वसिमा नावाच्या या इन्फ्ल्यूएन्सरने हा व्हिडीओ बनविला असून, @justlookatvd या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. आता यामध्ये नेमका ट्विस्ट काय होता ते जाणून घेऊ. एका माणसाने या इन्फ्ल्यूएन्सरला कानशिलात लगावल्यावर तिचा फलक उलटा फिरवला आणि त्यावर “निकालो १००” म्हणजे १०० रुपये द्या, असे लिहिले होते. म्हणजेच ज्यांनी ज्यांनी तिला कानाखाली मारले, त्यांना ती १०० रुपये देण्यास सांगते, असा तिचा हा प्रँक होता.

हेही वाचा… वयोवृद्धाचा संघर्ष पाहून डोळ्यात येईल पाणी! दिव्यांग आजोबांनी एका पायाने चालवली सायकल रिक्षा, VIDEO झाला व्हायरल

काहींनी तिला पैसे दिले, तर काही तसेच निघून गेले. या जमलेल्या पैशातून तिने गरिबांना मदत केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “न्यू स्टार्टअप आयडिया.” तर दुसऱ्याने “पैसे कमवण्याची नवी पद्धत,” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “कमाईतून ताईने काही गरजू लोकांना जेवण दिले, तिच्यासाठी खूप आदर.”