Viral Video Today: अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ आणि लॉजिक यांचा फारसा संबंध नसतो असं म्हंटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. टिकटॉक बंद झाल्यावर कदाचित या क्रिएटिव्हिटीला कुठेतरी आळा बसेल असे वाटत होते मात्र इंस्टाग्राम रील्स, युट्युब शॉर्ट्सच्या माध्यमातून अजूनही अनेक विचित्र व्हिडिओंचा वर्षाव इंटरनेटवर सुरूच आहे. आता तर नेटकऱ्यांनीही तक्रार करणे सोडून मज्जा घ्यायला सुरुवात केली आहे. असाच एक मूर्खपणाचा कळस वाटावा असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चक्क काहींनी रस्त्यावरच का महिलेची प्लास्टिक सर्जरी केल्याचे दिसून येत आहे. बसला ना धक्का? पुढे काय झालं पाहा.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक महिला भररस्त्यात प्लास्टिक सर्जरी करताना दाखवलेली आहे, बरं यासाठी डॉक्टर बाईंकडे उपकरण काय तर चक्क कोविड दरम्यान वापरण्यात आलेला फेस मास्क! ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येच ‘भररस्त्यात प्लास्टिक सर्जरी’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडीओ सुरु होताच काहीजण एका महिलेला रुग्णवाहिकेतून बाहेर काढताना दिसतात यानंतर त्या गर्दीतलीच एक जण फेस मास्क घेऊन येतो व त्या रुग्ण महिलेच्या तोंडावर लावतो, आता यात लॉजिक काय तर ज्याचा फेस मास्क लावला आहे त्याच्यासारखीच आता ही रुग्ण महिला सुद्धा दिसू लागेल.
भररस्त्यात केली प्लास्टिक सर्जरी
दरम्यान हा एखाद्या हिंदी मालिकेतील सीन वाटत आहे, व्हायरल झाल्यापासून या व्हिडिओला चक्क ९ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर तब्बल २१ हजाराहून अधिक लाईक्सही आहेत. कमेंट वाचून तर तुम्ही पार लोटपोटच व्हाल, तुम्ही सविस्तर कमेंट वाचण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करू शकता पण सगळ्यात पहिली गेलेली कमेंट म्हणजे का? मला का दाखवता हे सगळं? अशी आहे.