Video Shows Children Celebrate Their Fathers Birthday : सांताक्लॉज म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो पांढरी दाढी आणि मिशी असणारा एक आजोबा. त्याने लाल-लाल कपडे घातलेले असतात आणि त्याच्या डोक्यावर एक गोंडय़ांची लाल टोपी सुद्धा असते. तो सगळ्या शहाण्या मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू भेट म्हणून देतो. त्यामुळे ख्रिसमस सणा दरम्यान रात्री झोपताना लहान मुले उशी खाली मोजा आणि त्यात छोटीशी चिट्ठी ठेवून झोपून जायची. पण, गोष्टीतील हा सांताक्लॉज अस्तित्वात असतो का? तर माझ्या मते तरी हो… कारण हा सांताक्लॉज दुसरा, तिसरा कोणी नसून आपला बाबाच असतो.

तुम्ही मागितलेली एखादी गोष्ट या खऱ्या आयुष्यातील सांताक्लॉजने दिलीच नाही असे कधी होणार नाही. तसेच यासाठी तुम्हाला कोणतीही चिट्ठी ठेवायची सुद्धा गरज भासणार नाही. कारण बाबा अगदी सांताक्लॉज प्रमाणे न सांगता आपल्या सगळे हट्ट आपल्या गरजा पुरवतात. तर आज सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या बाबांचा वाढदिवस सगळ्या मुलांनी मिळून साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यांनी अगदी सांताक्लॉज प्रमाणे बाबांच्या डोक्यावर रंगीबेरंगी टोपी घातली आणि त्यांना पुष्पगुच्छ सुद्धा दिले आहे.

म्हणूनच वडिलांचे आशीर्वाद असणे महत्वाचे आहे (Viral Video)

सांताक्लॉज प्रमाणे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारे बाबा प्रत्येक वेळी स्वतःचे सुखदुःख बाजूला ठेवून इतरांच्या गरजा पूर्ण करतात. त्यामुळे मुले हळूहळू मोठी झाली की, बाबांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर याच गोष्टीचे उदाहरण आज व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. मुलांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस हटके पद्धतीत साजरा केला आहे. सगळ्या मुलांच्या उपस्थितीत बाबांना केक कापण्यास सांगतात, त्यांना पुष्पगुच्छ देऊन, त्यांना मिठी मारून फोटो सुद्धा काढतात.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @iamapoorv_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जेव्हा तुम्हाला कळते की, खरा सांताक्लॉज तुमचा बाबा आहे कारण तो तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतो’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “म्हणूनच वडिलांचे आशीर्वाद असणे महत्वाचे आहे”, “सुपर हिरो”, “खरंय माझा सांताक्लॉज माझा बाबाच आहे” ; आदी अनेक कमेंट्स बाबांविषयी नेटकरऊ करत आहेत.