Father And Daughter Viral Video : बाबांचा जेवढा धाक असतो तेवढेच त्यांचे प्रेमसुद्धा असते. कधी प्रेमळ, कधी कठोर, कधी गंभीर, कधी बेस्ट फ्रेंड, तर कधी हक्काने ओरडणाऱ्या बाबांची ही दररोजची बदलती रूपं आपल्या हिताच्या दृष्टीनेच असतात. कधी मनातले न सांगणारे, मात्र त्यांच्या कृतीतून नेहमीच प्रेम व्यक्त करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये चिखलातून जाताना बाबांनी त्यांच्या लेकीसाठी अनोखा मार्ग शोधून काढला आहे. नक्की बाबांनी काय केलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, बाबा त्यांच्या लेकीला शाळेत सोडायला निघाले आहेत. त्यांच्या एका हातात दप्तर दिसते आहे आणि लेक त्यांच्या पुढे चालते आहे. त्यादरम्यान रस्त्यावर प्रचंड चिखल दिसतो आहे. या चिखलातून जाताना लेकीने घातलेले शूज खराब होऊ नये म्हणून बाबा तिची अनोख्या पद्धतीने मदत करताना दिसत आहेत. चिखल असल्यामुळे बाबा जवळच्या काही विटा घेऊन येतात. त्यानंतर पुढे काय करतात हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

https://www.instagram.com/reel/DFU9h21O9KD/?igsh=MWFwa2EwZ2ZudXlrNQ%3D%3D

एखाद्या पिकनिकला जायचे असेल किंवा एखादी महागडी वस्तू हवी असेल आणि त्यासाठी आई नाही म्हणाली की, आपण लगेच बाबांकडे हट्ट करतो. बाबा पैशांचा किंवा इतर कोणत्याची गोष्टीचा विचार न करता आपल्या आनंदासाठी ती गोष्ट करायला तयार होतात. तर व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, प्रचंड चिखल असल्यामुळे बाबा दोन ते तीन विटा रस्त्यावर ठेवतात. त्या विटांवरून मग बाबांची लेक चालण्यास सुरुवात करते. त्यानंतर बाबा मागे ठेवलेल्या विटा उचलून पुन्हा पुढे नेऊन ठेवतात आणि चिमुकली पुन्हा चालण्यास सुरुवात करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाबा आणि लेकीचे नातं

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @afreen____khan32 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘फक्त बाबा तिच्या लेकीचे लाड पुरवू शकतो’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून त्यांचे बाबांवर असणारे प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच हा व्हिडीओ पाहून ‘म्हणून मुली त्यांच्या बाबांवर सगळ्यात जास्त प्रेम करतात, बाबा आणि लेकीचे नातं तुम्हाला कळणारच नाही, बाबांसाठी व्हिडीओला एक लाईक तर दिलाच पाहिजे’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.