Viral Video Of Indian Railway : पोलीस अधिकाऱ्यांची वर्दी पहिली की, खूप अभिमान वाटतो. कोणताही दुःखद प्रसंग असो किंवा आनंदाचा क्षण पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र उभे असतात, नागरिकांना न्याय मिळवून देतात. पण, काही पोलीस अधिकारी या वर्दीचा गैरफायदा घेतानाही दिसतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये प्रवाशाने असा दावा केला आहे की, एक पोलिस अधिकारी न विचारता एसी कोचमधील त्याच्या आरक्षित सीटवर बसला होता.
एका भारतीय रेल्वे प्रवाशाने रेडिटवर याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पोलीस अधिकारी ट्रेनच्या लोअर बर्थ सीटवर बसलेला दिसत आहे. प्रवासी दुपारपासून त्याला सीट देण्यास सांगताना दिसत आहे. पण, पोलीस अधिकारी सीटवरून अजिबात उठला नाही. त्यामुळे प्रवासी दावा करीत आहे की, एका पोलिस अधिकाऱ्याने एसी कोचमधील त्यांची आरक्षित सीट ताब्यात घेतली आणि वारंवार विनंती करूनही ती सीट सोडण्यास नकार दिला.
तुम्ही अडचणीत असताना पोलिसांची आठवू नका (Viral Video)
व्हिडीओत पुढे पोलीस अधिकाऱ्याने प्रवाशाला विचारले, “तुम्हाला आता झोपायचे आहे का?” जेव्हा प्रवासी, “हो झोपायचे आहे”, असं उत्तर देतो. तेव्हा पोलिस अधिकारी उठतो; पण “तुम्ही अडचणीत असताना पोलिसांची आठवण काढू नका नका” असं एक वादग्रस्त आणि मनाला लागेल, असं विधान बोलून जातो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ या रेडिट अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “एका पोलिसाने न विचारता आमची सीट घेतली आणि सीटवरून हलण्यास नकार दिला, ही परवानगी आहे का?”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. एकदा बघाच हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
पण, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. काहींनी राखीव सीट आणि सामान्य प्रवासाच्या चिंतेकडे लक्ष वेधले. तर अनेक जण पोलिस असो वा सामान्य प्रवासी, भारतीय गाड्यांमधील जागा आणि अधिकार याबद्दलचा वाद अजूनही मार्गी लागलेला नाही याबद्दल बोलताना दिसत आहेत. तर काही जण त्यांनी, ”सीट तर दिली ना, आणखीन तुला काय हवं?”, ”माझ्याबरोबरही वंदे भारत ट्रेनमध्ये असंच काहीसं घडलं होतं”, ”गरिबाला दिलेला त्रास फिरून येतो” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.