Video Shows Drunk Driver Breaks Wall And Climbs Onto E Rickshaw : बहुतेक देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणे हे बेकायदेशीर आहे. कारण – जगभरातील रस्ते अपघातांचे हे प्रमुख कारण आहे. यामुळे दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच यामुळे फक्त आपण स्वतःचा नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालतो आणि मग शेवटी पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे कोणताच पर्याय उरलेला नसतो. कालपासून सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये स्कॉर्पिओ कार थेट रिक्षाच्या छतावर जाऊन पोहचली आहे.

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे धक्कादायक घटना घडली आहे. औछा पोलिस स्टेशन हद्दीतील एटा-मैनपुरी रोडवरील अचलपूर गावातून वेगाने स्कॉर्पिओ कार जात होती. स्कॉर्पिओ कार जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका घराचे बांधकाम सुरु होते. तितक्यात वेगाने स्कॉर्पिओ कार आली आणि घराची भिंत तोडून बाजूलाच पार्क केलेल्या ई-रिक्षावर चढली. रिक्षात कोणतीच व्यक्ती उपस्थित नसल्याने कोणीही या दुर्घटनेत जखमी झाले नाही. अपघातावेळी स्कॉर्पिओ कारमध्ये उपस्थित असलेले लोक मद्यधुंद होते ; असा दावा गावकरी करत आहेत.

स्कॉर्पिओ आणि ई-रिक्षाची टक्कर (Viral Video)

अपघातापूर्वी त्यांच्याकडून अशीच एक चूक झाली होती आणि ते पोलिसांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांपासून पळत असताना हा दुसरा अपघात झाला. स्कॉर्पिओ कारने दिलेल्या धडकेत ई-रिक्षाचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी अनेक गावकरी जमले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सुदैवाने, रिक्षात कोणीही प्रवासी नव्हते, अन्यथा खूप मोठे नुकसान झाले असते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी ही घटना रेकॉर्ड केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

औछा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्कॉर्पिओ आणि ई-रिक्षा दोन्ही जप्त केले. त्यांनी सांगितले की, चौकशी सुरू आहे आणि जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नंतर, पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाने असा दावा केला की, एका भटक्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना स्कॉर्पिओ चालकाची स्कॉर्पिओ आणि ई-रिक्षाची टक्कर झाली. कोणीही जखमी झाले नाही. दोन्ही पक्षांमध्ये परस्पर करार झाला. स्थानिक पोलिस ठाण्यात कारवाईसाठी कोणताही अर्ज प्राप्त झालेला नाही ; अशी कमेंट केली आहे.