Sundari Sundari Dance Viral Video : ‘एक नंबर तुझी कंबर’, ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल’, अशी गाणी गेल्या काही महिन्यांमध्ये इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाली. अजूनही या गाण्यांची क्रेझ कमी झालेली नाही. त्यातच गायक संजू राठोड जणू इन्स्टाग्रामवर नवा ट्रेंड घेऊन आला आहे. ११ सप्टेंबर रोजी संजू राठोडचे आणखी एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. “सुंदरी सुंदरी…”, असे या गाण्याचे नाव आहे. तर, या गाण्यावर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच रील्स बनवल्या आहेत.

पण, आज या गाण्यावर सफाई कामगाराने जबरदस्त डान्स केल्याचे दिसते आहे. सफाई कामगार कचऱ्याच्या गाडीत उभा राहून ‘सुंदरी सुंदरी…’वर डान्स करण्यास सुरुवात करतो. एवढेच नाही, तर त्याने गाण्याच्या प्रत्येक ओळीवर हुबेहूब स्टेप्स आणि हावभाव केल्याचे पाहून त्याला डान्सची किती आवड आहे हे स्पष्ट दिसून येते आहे. त्याचा उत्साह, त्यांचा डान्स करण्याचा आत्मविश्वास पाहून तुम्हीही कौतुक केल्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही.

“आपल्या कामात आपण खूश राहायचं” (Viral Video)

डान्स म्हणजे अनेकांचे पहिले प्रेम असते. पहिले प्रेम अनेकदा अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे डान्स करणे भरपूर आवडत असूनही अनेकदा त्यात करिअर करता येत नाही. पण, वेळात वेळ काढून आपली कला जोपासणे आणि आपण आहोत त्या क्षेत्रात काम करीत राहणेही खूप कमी लोकांना जमते. त्यामुळे आज हीच गोष्ट सफाई कामगार यांनी केली आहे. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @raghuvaran9344 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “क्षेत्र कोणतंही असू द्या हो…जीवनात आनंद घेता आला पाहिजे”, “वाह! आपल्या कामात आपण खूश राहायचं”, “कला ही नेहमी गरिबांच्या घरांत जन्माला येते”, “नाद पाहिजे. फक्त नाद नाही, तर मजा नहीं”, तर काही जण “तरीच आज काल कचऱ्याची गाडी उशिरा येते” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.