Video Shows Children Used A Python As A Skipping Rope : आपण लहानपणी व्यापार, सापशिडी, बॅडमिंटन, रशी उडी असे अनेक खेळ खेळलो आहोत. तर रशी उडी हा केवळ खेळ नसून एक उत्तम फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीसुद्धा आहे. त्यामुळे लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कोणालाही नियमित रशी उडी मारणे फायदेशीर ठरू शकते. पण, आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये काही लहान मुले अजगराच्या मदतीने रशी उडी हा खेळ खेळताना दिसत आहेत, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हायरल व्हिडीओ (Video) ऑस्ट्रेलियातील आहे. काही लहान मुले अजगराचा दोरी म्हणून वापर करताना दिसले आहेत. एवढेच नाही, तर अजगराचा दोरी म्हणून वापर करून चक्क रशी उडी खेळताना दिसत आहेत. या छोट्या क्लिपमध्ये साधारण सहा मुले एक मीटरपेक्षा जास्त लांबीच्या अजगरावर उडी मारताना दिसले आहेत. अजगराचे नाव काढल्यावर अनेक जण थरथर कापतात. पण, या चिमुकल्यांनी सगळ्यांना थक्क करून सोडले आहे. अजगराबरोबर रशी उडी हा खेळ कशा प्रकारे खेळला जातोय ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

https://twitter.com/clowndownunder/status/1898892150513049705

लहान मुलांचे खेळ हे काही निराळेच असतात. ते कधी कोणत्या गोष्टीचा वापर त्यांच्या खेळात करतील हे काही सांगता येत नाही. त्यांच्या खेळण्यात मोठ्या लोकांच्या अनेक वस्तूंचा सहभाग असतो. जसे की, आईची ओढणी, स्वयंपाकघरातील भांडी आदी गोष्टींनी त्यांना खेळायला भरपूर आवडते. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, इथे तर मुलांनी चक्क मेलेल्या अजगरालाच त्यांच्या खेळात सहभागी करून घेतले आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घर लुटणे, गाड्या चोरण्यापेक्षा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @clowndownunder या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. “मुलांना जेव्हा हा साप सापडला तेव्हा तो आधीच मेला होता, त्यामुळे कोणत्याही प्राण्याला प्रत्यक्षात इजा झाली नाही.”, “फक्त काही मुले खेळत होती, कमीत कमी घर लुटणे, गाड्या चोरण्यापेक्षा अजगराबरोबर रशी उडी खेळणे ठीक आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहे.