Viral Video Shows Father And Daughter Bond : या जगात आल्यावर सर्वांत आधी मुली कोणत्या पुरुषाला ओळखू लागतात, त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात तो म्हणजे त्यांचा लाडका बाबा. लहानपणी आईने एखाद्या गोष्टीची परवानगी नाही दिली की, बाबांकडे जाऊन ती गोष्ट हक्काने मागून घेण्यापर्यंत ते पहिल्या पगारातून त्यांना भेटवस्तू देण्यापर्यंतचा प्रवास सगळ्यांसाठी खास असतो. तर आज असाच एक बाबा आणि लेकींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बाबांना बक्षीस मिळताच दोन्ही मुलींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे दिसले आहेत.

व्हायरल व्हिडीओ नक्की कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, व्हिडीओनुसार बाबा बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर करत असतात आणि ते बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेत ते विजयी ठरलेले असतात. तर याच पार्श्वभूमीवर त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले जात असते. यावेळी त्यांच्या दोन्ही मुलींना स्टेजवर बोलावले जाते आणि बाबांना ट्रॉफी मिळाली आहे हे पाहून त्या चिमुकल्या मुलींची प्रतिक्रिया काय असते, त्या नेमक्या कशा हावभाव व्यक्त करतात ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा.

हेही वाचा…‘हे असतं बापाचं प्रेम’; सासरी जाणाऱ्या लेकीसाठी नकळत हात जोडणारे बाबा; VIRAL VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

व्हिडीओ नक्की बघा…

मुलगी रडू लागली…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, बाबांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले जात असताना त्यांच्या मुलींनादेखील स्टेजवर बोलवून घेतले जाते. बक्षीस देताना फोटो काढले जात असतात आणि जमलेले प्रेक्षक टाळ्या वाजवत असतात. ते सर्व दृश्य पाहून बाबांच्या दोन्ही मुलींच्या डोळ्यांत नकळत पाणी येते. तेव्हा बाबा मुलींचा हात धरतात आणि आई मुलींचे डोळे पुसू लागते. इथेच व्हिडीओचा शेवटदेखील होतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत चटकन पाणी आलं असेल एवढं नक्की.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण एखाद्या स्पर्धेत जिंकलो की, आई-बाबा खूप खूश होतात. पण, आपल्या बाबांना बक्षीस दिले जात आहे हा आनंदमयी क्षण मुलींसाठी खूप खास ठरला आणि तो आनंद त्यांच्या डोळ्यांत दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘वडिलांना ट्रॉफी मिळताच त्यांची मुलगी रडू लागली’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओतील मुलींचे बाबांवर असणारे प्रेम पाहून अनेक नेटकरी त्यांचे कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.