Video Shows Car Bike accident Outside Petrol Pump : बाईक किंवा कारच्या मालकाला बाईक वा कार कशी चालवायची, ट्रॅफिक नियम काय हे माहीत असणेही गरजेचे आहे. पण, तरीही कित्येक जण आपल्याकडे बाईक किंवा कार किती महागडी किंवा चांगली आहे ही गोष्ट दाखवण्याला जास्त प्राधान्य देतात आणि याच गोष्टीमुळे रस्त्यावर गंभीर अपघात होत असतात. त्यामुळे इतरांच्या पुढे जाण्याचा उत्साह आपल्याला नडतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; यामध्ये नक्की कोणत्या वाहन चालकाची चूक आहे हे कळायला मार्गच उरला नाही आहे.

बंगळुरूमधील पेट्रोल पंपावर एक घटना घडली; ज्यामध्ये महिलेच्या कार आणि बाईकमध्ये जोरदार टक्कर झाल्याचे दिसून येत आहे. घडलं असं की, पेट्रोल पंपातून बाहेर पडताना बाईक चालकाने महिलेच्या गाडीला जोरदार टक्कर दिली आहे. यामुळे महिला चिडली आणि तिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या अपघातात गाडीचा फेंडर आणि बंपर पूर्णपणे फाटलेला दिसतो आहे. याउलट, बाईक चालकाची रॉयल एनफील्ड बाईकलाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते आहे.

तो नाटक करतो आहे (viral Video)

एवढेच नाही तर बाईक चालकाच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होताना दिसतो आहे. पेट्रोल पंपाबाहेर उभा राहून बाईक चालक बाटलीतील पाण्याने रक्त धुण्याचा प्रयत्न करतो आहे. पण, दुसरीकडे महिला बाईक चालकाला ऐकवत त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करत “त्याच्या बाईकला काहीही झाले नाही, सगळं ठीक आहे, तो नाटक करतो आहे. त्यापेक्षा माझी गाडी बघा” ; असे म्हणत कर्मचाऱ्यांकडून पुरावा म्हणून इंधन पंपाचे बिल व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gharkekalesh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘बंगळुरूमध्ये महिला आणि बाईक चालक यांच्या अपघातानंतरचं भांडण’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. माहितीनुसार दोन्ही पक्षांविरुद्ध कोणतीही पोलिस कारवाई करण्यात आलेली नाही. पण, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. महिलेचा अश्लील भाषेचा आणि जखमी पुरुषाप्रती दया दाखवताना दिसत आहेत.