Ek Numbar Tuzi Kambar Song Viral Video : एखादे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालं की, त्यावर डान्स करण्याचा मोह कोणाला आवरत नाही. आता “एक नंबर तुझी कंबर” या गाण्याचे उदाहरण घ्या ना. या गाण्यावर आपल्यातील प्रत्येकाने घरी का होईना एकदा तरी डान्स करून नक्कीच पहिला असेल. अगदी चिमुकल्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण यावर ठेका धरून आवडीने रिल्स बनवताना दिसत आहेत. पण, आज सोशल मीडियावर शिक्षिकेचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये शिक्षिका विद्यार्थ्यांबरोबर डान्स करताना दिसते आहे.

शाळा म्हटले की, शिकविणे आणि शिकणे एवढे दोनच शब्द आपल्याला आठवतात. पण, अनेकदा करमणुकीसाठी शिक्षक सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांकडून करून घेत असतात. जेणेकरून त्यांनाही अभ्यासाव्यतिरिक्त काही तरी नवीन शिकता यावे. तर आजच्या व्हायरल व्हिडीओत अनेक विद्यार्थी शिक्षिकेसमोर उभे आहेत आणि शिक्षिका त्यांना ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर डान्स करून दाखवते आहे. एवढेच नाही तर विद्यार्थी सुद्धा शिक्षिकेचा डान्स स्टेप्स हुबेहूब कॉपी करताना दिसत आहेत.

शिक्षिकेचा सुंदर डान्स (Viral Video)

आताच्या गाण्यांचा ट्रेंड इन्स्टाग्रामवरून ठरतो. एखादे गाणे इन्स्टाग्रामवर रील बनव्यासाठी सतत वापरले गेल्यास ते लोकप्रिय होऊन जाते. तर आज व्हायरल व्हिडीओत ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर शिक्षिकेने चक्क चिमुकल्या विद्यार्थ्यांनबरोबर डान्स करून हा ट्रेंड पूर्ण केला आहे. शिक्षिका चिमुकल्यांना एकेक स्टेप्स अगदी हळुवारपणे शिकवताना दिसत आहेत आणि स्वतःही डान्स एन्जॉय करत आहे. शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, डान्स करताना शिक्षिकेचे हावभाव, तिच्या सुंदर स्टेप्स आणि तिने गाण्यावर धरलेला ताल अगदी बघण्यासारखा आहे. शिक्षिकेचा सुंदर डान्स पाहून चिमुकले विद्यार्थीही गाणे एन्जॉय करत जोरजोरात, उड्या मारत डान्स करताना दिसत आहेत. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ… सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @dixhaaa_.17 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.