कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर ‘काला चष्मा’ या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूल घातलाय. सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर लोक या गाण्यावर आपले वेगवेगळे व्हिडीओ बनवून ते सर्वत्र शेअर करत आहेत, मग ते फेसबुक असो वा इन्स्टाग्राम किंवा मग ट्विटर. या गाण्यावर लोक फेमस डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. आता हे गाणं थेट आफ्रिकेपर्यंत पोहोचलंय. सोशल मीडियावर नेहमी बॉलिवूड गाण्यांवर आपले डान्स व्हिडीओ शेअर करत व्हायरल झालेले आफ्रिकन भावंड किली पॉल आणि नीमा पॉल या दोघांचा नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये दोघा बहिण-भावाने ‘काला चष्मा’ गाण्याच्या ट्रेंडमध्ये उडी घेत यावरचा नवा व्हिडीओ शेअर केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईलची स्क्रीन स्क्रोल करत असताना टांझानियन भावंड किली पॉल आणि नीमा पॉलचे व्हिडीओ एकदा तरी तुमच्या नजरेस पडले असतील. या टांझानियन भावंडांचा एक नवा व्हिडीओ सध्या भरपूर गाजतोय. या टांझानियन बहिण-भावावर आता ट्रेंडमध्ये असलेले ‘काला चष्मा’ या गाण्याचा फीवर चढलाय. या व्हिडीओमध्ये किली पॉल आणि नीमा पॉल यांनी आपल्या हटके अंदाजात डान्स केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांचे एक्सप्रेशन, डान्स स्टाईल, अभिनय आणि त्यांचे मूव्ह्स पाहून लोक त्यांच्या आणखी प्रेमात पडले.

आणखी वाचा : मुंबई पोलीस अधिकारी आणि चिमुकलीचा हा क्यूट VIRAL VIDEO एकदा पाहाच!

या व्हिडीओमध्ये सुरूवातीला नीमा पॉल उभी असलेली दिसत आहे. तर किली म्हातारा होऊन एंट्री करताना दिसून येतोय. तो येताच ‘काला चष्मा’चं गाणं सुरू होतं आणि आधी तो चालता चालता पडलेला दिसतो. खाली पडल्यानंतर तो काला चष्मा गाण्याची म्यूझिक ऐकू येताच तो आपला डान्स सुरू करतो. किली पॉल अक्षरशः या गाण्यात रमून गेलेला दिसतोय. दोघेही पूर्ण उत्साहाने हसत नाचत आहेत. या गाण्यातील काही हूक स्टेज सुद्धा अप्रतिमरित्या फॉलो करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये डान्स करताना त्याचा जो जोश पहायला मिळाला, ते पाहून लोक त्याच्या आणखी प्रेमात पडू लागले आहेत. किलीचा परफॉर्मन्स पाहून सारेच जण थक्क झाले आहेत आणि सगळेच त्याचं कौतुक करत आहेत.

आणखी वाचा : स्विमिंग पूलमध्ये बुडत होती आई, १० वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ किली पॉल याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. नेहमीप्रमाणे त्याचा हा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडीओला आतापर्यंत २.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ लाख ३४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. किली पॉल आणि नीमा पॉल हे दोघे भावंड आफ्रिकेचे असले तरी भारतात मात्र यांची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. किली पॉल याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तब्बल ४.२ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत.

आणखी वाचा : Teachers Day 2022: मानवी तस्करीतून ४०० हून अधिक मुलांना वाचवणाऱ्या या शिक्षकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दारू पिण्याचे फायदे; म्हणतात, “पाणी मिसळून प्यायल्यास औषध बनतं…”

नेहमीप्रमाणे या ही व्हिडीओमध्ये किली पॉल त्याच्या पारंपारिक पेहराव ‘मसाई’मध्ये दिसून आलाय. एका मुलाखतीदरम्यान किली पॉलने सांगितले होते की, त्याला लहानपणापासूनच बॉलिवूड गाणी आवडतात. यासोबतच त्याने हेही सांगितले होते की, त्याच्या गावात वीज नाही, त्यामुळे मोबाईल चार्ज करण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागते. यानंतर तो मोबाईलवरून व्हिडीओ बनवतो आणि इन्स्टाग्रामवर शेअर करतो. किली पॉलने सांगितले की, ‘मला बॉलीवूड चित्रपट आवडतात कारण मी भारतीय चित्रपट बघत मोठा झाले आहे. मी बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड गाणी ऐकत आहे. त्यामुळे माझी हिंदी गाण्यांची आवड वाढली. हिंदी गाणी ऐकल्यावर खूप छान वाटतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video trending kili paul joins kala chashma trend wows fans with his cool moves insta reel prp
First published on: 05-09-2022 at 18:06 IST