आजकाल सोशल मीडियावर खाद्यपदार्थांचे विचित्र कॉब्मिनेश व्हायरल होत असतात. कधी कुणी आईस्क्रीमसोबत पिझ्झा पाणीपुरी बनवतय. तर कुणी रसगुल्ला चाट आणि भेंडी समोस्याचे विचित्र कॉब्मिनेशन बनवत आहेत. खाद्यपदार्थांचे हे विचित्र फ्यूजन पाहून अनेकदा युजर्सचाही संताप होतोय. असाच आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुणी बर्फाळ प्रदेशात फिरायला गेली असताना तिथे आजूबाजूला जमिनीवर पडलेल्या बर्फापासून चक्क स्नो आईस्क्रीम बनवताना दिसतेय. जे पाहून युजर्सने पुन्हा संताप व्यक्त केला आहे.

अनेकांना एकदा तरी काश्मीर, हिमाचल प्रदेशच्या बर्फाळ प्रदेशात मनसोक्त फिरण्याची इच्छा असते. यात काहींना आजूबाजूला पडलेल्या बर्फात लोळण्याची, स्नो मॅन बनवण्याचा मोह आवरत नाही. अशाप्रकारे एका तरुणीला या बर्फापासून आईस्क्रीम बनवण्याचा मोह आवरला नाही आणि तिने खरोखरचं जमिनीवर पडलेल्या बर्फापासून आईस्क्रीम बनवली आणि ती खाल्ली. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी तु्म्हाला जमिनीवर पडलेला बर्फ आधी एक बाउल घेताना दिसतेय. यानंतर ती त्या बर्फात थोडंस कंडेन्स्ड मिल्क व्हॅनिला इसेन्स मिसळताना दिसतेय. जमिनीवर पडलेल्या ताज्या बर्फापासून बनवलेले आईस्क्रीम खात असलेल्या या तरुणीच्या व्हिडीओवर आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या रिएॅक्शन येत आहेत. हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशमधील मनालीमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. या हिल स्टेशनवर पडलेल्या बर्फापासून तरुणी कशी आईस्क्रीम बनवतेय तुम्ही पाहू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सने व्हिडीओवर व्यक्त केला संताप

ठाकूर सिस्टर्स नावाच्या फूड ब्लॉगिंग पेजने हा स्नो आईस्क्रीमचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यात व्हॅनिला आईस्क्रीम बनवून खाण्यासाठी तरुणीने कशाप्रकारे जमिनीवर पडलेल्या बर्फाचा वापर केला हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहिले. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक युजर्सना बिलकुल आवडलेला नाही. अनेकांनी यावर उलट-सुलट कमेंट्स केल्या आहेत. अनेक युजर्सनी अशाप्रकारची आईस्क्रीम आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे. तर काही युजर्सनी या बर्फापासून बनवलेल्या आईस्क्रीमचे वर्णन अस्वच्छ असे केले आहे.