Viral Video Today: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. यात चूक बरोबर काय यावर जरी दुमत दिसत असलं तरी जे घडतंय ते क्रूर आहे असा एकच सुर नेटकऱ्यांनी धरला आहे. छत्तीसगडच्या अंबिकापूर मेडिकल कॉलेजमध्ये झोपलेल्या एका पुरुषाने महिलेला एक साधा प्रश्न विचारल्यावरून हे महाभारत सुरु झाले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की संतप्त महिला ही झोपलेल्या पुरुषाला चप्पलेने मारताना, लाथांनी तुडवताना दिसत आहे. यावेळी नेमकं काय घडलं होतं पाहुयात..

प्राप्त माहितीनुसार, अंबिकापूर मेडिकल कॉलेजच्या ओपीडीमध्ये एक पुरुष झोपला असताना एका महिलेने खोलीतील कुलर बंद केला यावरून झोपमोड झालेल्या त्या व्यक्तीने महिलेला “मॅडम कूलर का बंद केला?” असा साधा प्रश्न विचारला. यावर महिलेने चक्क पायातील स्लीपर काढून पुरुषाला मारहाण सुरु केली व ती आवाज चढवून भांडू लागली. यावेळी तिने दोन तीन वेळा लाथ मारून समोरच्या पुरुषावर आरडाओरडा केला, हे सगळं घडत असताना महिलेच्या शेजारी उभी असणारी दुसरी व्यक्ती त्या झोपलेल्या पुरुषाला काठीने मारताना दिसत आहे.

भांडण वाढल्यावर स्थानिक पोलिसांना रुग्णालयात बोलावण्यात आले. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा महिलेने सांगितले की, एका रुग्णाला थंडी वाजत असल्याने तिने कुलर बंद केला होता.ओपीडीमध्ये झोपलेल्या या पुरुषाचे कोणतेही नातेवाईक रुग्णालयात दाखल नाहीत फक्त खूप उकडतंय म्हणून तो कुलरच्या हवेत झोपण्यासाठी तिथे आला होता.

महिलेने चप्पलेने केली मारहाण.. व्हायरल व्हिडीओ

Video: श्रीमंतीचा माज भोवला! मद्यधुंद तरुणीने वॉचमनला कॉलर खेचून जवळ ओढलं अन तितक्यात..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पोलिसांनी महिलेला अटक केल्याचे कोणतेही वृत्त नाही. पोलिसांनी त्या मारहाण झालेल्या व्यक्तीला केवळ वसतिगृहातुन निघून जाण्यास सांगितले व विषय संपवला. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला असून मारहाण करणाऱ्या महिलेच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच या जागी जर एखादा पुरुष असता तर असाही प्रश्न अनेकांनी केला आहे. या पूर्ण व्हिडिओमध्ये मारहाण सहन करणाऱ्या पुरुषाने महिलेला प्रत्युत्तर दिले नाही त्यामुळे अनेकांनी त्याची बाजू घेत सोशल मीडियावर या प्रकरणाच्या तपासाची मागणी केली आहे.