Viral: ‘गर्लफ्रेंड न पटण्या बाबत’ म्हणत तरुणाचं थेट आमदारांना पत्र!

पत्र लिहिणाऱ्या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्याला शोधल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगण्यात येत आहे.

हे पत्र व्हायरल झालं आहे. (फोटो:सोशल मीडिया)

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. असचं एक पत्र सध्या सोशल मीडीयावर फार धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे आमदारांची झोप उडली आहे. लोकांच्या समस्यांवर काम करणारे स्थानिक आमदार सुभाष घोटे यांना असे पत्र मिळाले आहे, जे वाचून आपल्याला हसू येईल.

पत्रात गर्लफ्रेंड हवी अशी मागणी

“विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरून मुली असून मला एकही गर्लफ्रेंड नसल्याने चिंतेची बाबा आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून रोज कामाच्या निमित्ताने राजौरा ते गडचंदूर प्रवास करतो. पण मला एकही मुलगी पटत नाही. इथे दारू विक्रेत्यापासून ते काळ्या लोकांपर्यंत, सगळ्यांना त्यांच्याही गर्लफ्रेंड असते, ते बघून माझा जीव जळून राख होतो. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन केला पाहिजे, की आमच्या-सारख्यानकडे सुद्धा लक्ष भाव देण्यात यावा.” असं लिहित शेवटी त्यांनी आपलं प्रेमी, भूषण राठोड असं लिहले आहे.

हे पत्र व्हायरल झालं आहे

latter

मुलाच्या शोधात आमदार

पत्र लिहिणाऱ्या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. आमदार सुभाष घोटे यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे अनेक पत्रे येतात आणि समस्या सोडवल्या जातात. परंतु अशा पत्रांमुळे वेळ वाया जातो. तरुणाला शोधल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral young mans letter directly to mlas saying about not getting girlfriend ttg

ताज्या बातम्या