Virat Kohli dance viral: मंगळवारी रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. पहिला आयपीएल विजेता म्हणून इतिहास रचला. विराट कोहलीसाठी हा विजय खूप खास होता. विराटने आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या १७ हंगामात संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता परंतु प्रत्येक वेळी त्याला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी भन्नाट डान्स करत आपला आनंद साजरा केला. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला जोरदार व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हॉटेलमध्ये आल्यानंतर आरसीबी टीमच्या स्वागताला ढोल वाजवून जल्लोष करण्यात आला. यावेळी विराट कोलहीसोबतच टीममधल्या सर्वांनी खेळाडूंनी डान्स करत एकच कल्ला केला. यावेळी सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे.
आऱसीबीच्या या विजयानंतर विराट कोहलीने भावुक होत पहिली पोस्ट शेअऱ केली आहे. ज्यामध्ये मैदानावरील ट्रॉफी उचलतानाचे आणि ट्रॉफीबरोबर फोटोशुट केलेले काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये विराट म्हणाला, “या संघाने ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं, हा सीझन मी कधीच विसरणार नाही. आम्ही गेल्या २.५ महिन्याच्या या प्रवासाचा कमालीचा आनंद घेतला आहे. ही ट्रॉफी आरसीबीच्या चाहत्यांसाठी आहे, ज्यांनी आमच्या वाईट काळात आमची कधीच साथ सोडली नाही. ही ट्रॉफी इतक्या वर्षांचा हार्टब्रेक आणि निराशेसाठी आहे. संघ म्हणून खेळताना मैदानावर केलेल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नासाठी आहे.” “आयपीएल ट्रॉफीबद्दल काय बोलू…, मित्रा ही ट्रॉफी उचलून आनंद साजरा करण्यासाठी मला तू १८ वर्षे वाट पाहायला लावली. पण या प्रतिक्षेनंतरचा आजचा आनंद अनोखा आहे”, असं म्हणत विराट कोहलीने या कॅप्शनला शेवटी हार्ट, ट्रॉफी आणि आरसीबीला टॅग करत पूर्ण केलं आहे.
पाहा व्हिडीओ
आरसीबीच्या विजयानंतर आज दुपारी 3.30 वाजता बंगळुरूमध्ये विजयी परेड निघणार आहे, याची घोषणा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर पेजवर करण्यात आली आहे. ही विजयी परेड विधान सौधाइथून सुरू होऊन चिन्नास्वामी स्टेडियमवर जाऊन संपेल. याबाबतची अतिरिक्त माहिती पुढील काही वेळात संघाकडून देण्यात येणार आहे.