वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आवडता दिवस असतो. या दिवशी जवळपास प्रत्येकालाच खूप स्पेशल ट्रिटमेंट मिळते. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या. कोणी खास केक कापून वाढदिवस साजरा करतं तर कोणी वाढदिवसाचं हटके सेलिब्रेशन करतं. मात्र वर्ध्यात असंच एक वाढदिवसाचं सेलिब्रेशन तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वर्ध्याच्या सिंदी मेघे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. केक कापताना स्प्रे तोंडावर मारताना ‘फायर गन’ मधून ठिणगी पडल्याने आग लागली आहे. जखमी झाल्यानंतर तरुणाने तात्काळ वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले. कान आणि नाकाजवळ त्याला किरकोळ जखम झाली आहे. आगीवर वेळीच नियंत्रण आल्याने तोंड जळता जळता थोडक्यात बचावलेय. दरम्यान, बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. काल रितीकचा वढदिवस होता. जसे सर्व मित्रांचे वाढदिवस साजरे केले गेले त्याच प्रमाणे त्यालाही मित्रांनी सेलिब्रेशनसाठी बोलावले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण आपल्या मित्रांसोबत केक कापत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Viral Video: हत्ती आणि गेंड्याची टफ फाईट; पाहा कोणाची झाली हवा टाईट
दरम्यान त्याला उपचारासाठी तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. लग्नसमारंभ आणि वाढदिवसाच्या पार्टीत वापरले जाणारे स्प्रे अत्यंत ज्वलनशील असतात. त्याच्या ज्वलनशीलतेचे कारण म्हणजे त्यात वापरलेले अल्कोहोल. अल्कोहोल हे ज्वलनशील रसायन असल्याने ते अनेक प्रकारे वापरले जाते. त्याचप्रमाणे स्प्रे बनवण्यासाठीही त्याचा वापर होतो. वर्ध्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणावरही अशीच फवारणी करण्यात आली, त्यामुळे आग लागली. आगीमुळे तरुणाचा जीव संकटात सापडला होता.